Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9 बळी, जाणून घ्या इतर सविस्तर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसनं सर्वत्रच थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची सख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 807 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात कोरोनामुळं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आता पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा हा 19849 वर पोहचला आहे

आज आढळून आलेल्या 807 नवीन रूग्णांपैकी 11 ससून, 435 नायडू तर 361 रूग्ण हे खासगी रूग्णालयातील आहेत. दिवसभरात तब्बल 619 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 685 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तब्बल 12 हजार 290 रूग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 6874 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 389 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 59 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.