Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरूच आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे तर 640 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं बळी गेलेल्यांची संख्या 751 वर जावुन पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात तब्बल 672 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आता कोरोनाबाधितांचा आकडा 23021 वर जावुन पोहचला आहे. आतापर्यंत तब्बल 14411 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात एकुण 7859 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहे. दरम्यान, अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 7859 रूग्णांपैकी 385 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 63 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. आज आढळून आलेल्या 640 नवीन कोरोना पॉझिटिव्हपैकी 7 रूग्ण ससून, 483 रूग्ण नायडू आणि 150 रूग्ण हे इतर खासगी रूग्णालयातील आहेत. दरम्यान, कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळं पुणे शहरात तब्बल 751 जणांचा बळी गेला आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासन आहवान करीत आहे. दिवसभरात तब्बल 672 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.