Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1499 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासनानं कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 1499 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारानंतर बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 761 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 31 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आज पुण्याबाहेरील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळं पुणे शहरात मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 1571 वर पोहचली आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 66727 आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 50 हजार 113 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात कोरोनाचे 15 हजार 43 रूग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 738 हे क्रिटिकल असून त्यापैकी 444 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. दिवसभरात तब्बल 1499 रूग्ण कोरोनातुन मुक्त झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.