Pune Corporation | लोहगाव येथील पठारे वस्तीतील 2 अनधिकृत इमारती पालिकेने केल्या जमीनदोस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या (Pune Corporation) बांधकाम विभागाने लोहगांव येथील पठारे वस्तीतील (pathare wasti lohegaon) अनधिकृतपणे बांधलेल्या पाच मजली दोन इमारती पाडल्या. या (Pune Corporation) कारवाईत तब्बल 6 हजार चौ. फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले.

 

 

पठारे वस्तीतील (lohegaon) शेत जमिनीवर दोन पाच मजली इमारतींचे बांधकाम सुरू होते. या दोन्ही इमारतींचे स्लॅब आणि वीज बांधकाम करण्यात आले होते. शेत जमिनीवर मुळात बांधकाम करताच येत नसल्याने महापालिकेच्या (Pune Corporation) बांधकाम विभागाने दोन्ही इमारतींच्या मालकांना नोटीस बजावल्या होत्या. परंतू या नोटीसींकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे आज बांधकाम विभागाने (Building permmisson) पोलिस बंदोबस्तामध्ये (Police) कारवाई केली. कारवाईसाठी जॉ कटर या अजस्त्र यंत्रासोबतच दोनच बुलडोझर, ३ ब्रेकर आणि गॅस कटरचा वापर करण्यात आला. तसेच अभियंता खलाटे आणि पाथरकर यांच्या नेतृत्वाखाली बिगार्‍यांच्या फौजेने इमारतींचे स्लॅब तसेच वीज बांधकाम तोडून इमारत पाडली.

Web Title :- Pune Corporation | 2 unauthorized buildings in the plateau area of ​​Lohegaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Airport | …म्हणून पुण्यातील लोहगाव विमानतळ ‘या’ तारखेपासून 15 दिवस बंद राहणार

Palghar ZP By-Election | पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा थेट शिवसेनेला पाठिंबा; राजकीय वर्तुळात खळबळ