Pune Corporation | शहरातील अनाधिकृत बॅनर अन् झेंड्यांबाबत पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | शहरातील बेकायदा जाहिरात फलकांची महापालिका प्रशासनाने (Pune Corporation) गंभीर दखल घेतली आहे. बेकायदा जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर आणि झेंडे (illegal banners and flags) काढण्याच्या खर्चापोटी संबधितांकडून एक ते पाच हजार रुपये दंड (Fine) आकारण्यात येणार आहे.

 

शहरात मोठ्याप्रमाणावर जाहीरात फलक उभारण्यात आले आहेत. यासोबतच बेकायदा बोर्ड, बॅनर आणि झेंड्यांच्या प्रत्येक रस्त्यावरील मोठ्या संख्येमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. महापालिकेच्यावतीने वेळोवेळी बेकायदा फलक, बोर्ड, बॅनर (illegal banners and flags) काढण्यात येतात. परंतू त्या व्यतिरिक्त कुठलिच कारवाई होत नसल्याने बेकायदा बोर्ड, बॅनरचा अगदी सुळसुळाट झाला आहे. दुसरीकडे हे बेकायदा फलक काढण्यासाठी महापालिकेला (Pune Corporation) मोठ्याप्रमाणावर खर्च येतो. तसेच मनुष्यबळही मोठ्याप्रमाणावर लागते. दुसरीकडे फलक काढण्यावरून पालिकेचे कर्मचारी व संबधित नागरिक अथवा कार्यकर्त्यांचाही सातत्याने वाद होतो.

 

या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने (Pune Corporation) २००९ मध्ये सर्वसाधारण सभेने मंजुर केलेल्या धोरणाची कडक अंमलबजावणी करून बेकायदा बोर्ड, बॅनर लावणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार एक ते १० बोर्ड लावणार्‍यांकडून कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच बेकायदा जाहिरात फलक (advertisement banner and hoarding) लावणार्‍यांना नोटीस बजावून संबधित फलक नियमान्वीत होत असेल तर त्याच्याकडून परवाना शुल्क व जेंव्हापासून फलक उभारला असेल तेंव्हापासूनचे शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. परवानगी दिलेल्या जाहिरातदारांकडून नुतनीकरणाचे शुल्क भरण्यास विलंब झाल्यास तीन महिन्यांपर्यंत विलंब असेल तर २५ टक्के, सहा महिन्यांपर्यंत ५० टक्के व त्यापेक्षा अधिक कालावधी झाला असेल तर १०० टक्के विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

जाहिरात फलकासाठी आजपासून ‘ऑनलाईन’ अर्ज सुविधा
जन्म- मृत्यू दाखले व बांधकाम परवानगीपासून विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार्‍या महापालिकेने आजपासून जाहिरात फलक उभारणीच्या परवानग्यांसाठीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जाहिरात फलक परवानगीसाठी यापुढे ऑनलाईन अर्जच्या स्वीकारले जाणार आहेत.

 

पुणे शहरामध्ये तीन हजारांहून अधिक जाहिरात फलक आहेत. यासोबतच तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात येतात.
या फलकांच्या परवानगीसाठी आतापर्यंत महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडे लेखी स्वरूपातील विहित नमुन्यातील अर्ज करावा लागत होता.
परंतू महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने महापालिकेच्या संकेतस्थळावरच आता विहीत नमुन्यातील अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे जाहिरात फलकाच्या परवानगीसाठी संबधितांना घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
त्यानुसार महापालिकेने आजपासूनच ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली असून यापुढे कुठलाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
क्षेत्रिय कार्यालयाने तसेच मुख्य विभागाने कुठलेही ऑफलाईन अर्ज स्वीकारू नयेत,
ते ग्राह्य धरले जाणार नाहीत असे आदेशही परवाना व आकाश चिन्ह विभागाने काढले आहेत.
येत्या काही दिवसांत नामफलक, साठा परवाना व मशिनरी परवान्याचे अर्जही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती या विभागाचे उपायुक्त विजय लांडगे (Deputy Commissioner Vijay Landage) यांनी दिली आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Big decision of Pune Municipal Corporation regarding unauthorized banners and flags in the city!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bombay High Court | ‘…तुमच्याविरोधात कारवाई का करु नये?’ उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Rakesh Jhunjhunwala | चांगली कमाई करून देऊ शकतो राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील रू. 250 चा ‘हा’ स्टॉक!

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1087 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी