Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील 600 पेक्षा जास्त कर्मचारी केले जाणार कमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation Employees | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या २३ गावांतील ग्रामपंचायतीनी बोगस भरती केलेल्या 600 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना (Pune Corporation Employees) महापालिका कामावरून कमी करणार आहे.

 

वर्षभरापुर्वी हद्दीवरील २३ गावांचा पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation) समावेश करण्यात आला. यामध्ये म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक,किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्‍हे, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली गावांचा समावेश आहे. शासनाने गावे महापालिकेमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ग्रामपंचायींमध्ये कर्मचार्यांची मोठ्याप्रमाणावर बोगस भरती करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मागीलवर्षी प्रत्यक्षात गावे समाविष्ट करण्याचा आदेश निघाल्यानंतर महापालिकेने ग्रामपंचायतींचे मालमत्ता व कर्मचारी वर्गीकरणासह सर्व दप्तर ताब्यात घेतले. (Pune Corporation Employees)

 

दरम्यान कर्मचार्‍यांची बोगस भरती (Bogus Recruitment) केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष्य प्रसाद (Pune: Zilla Parishad CEO Ayush Prasad) यांनी चौकशी समिती (Inquiry Committee) स्थापन केली. या चौकशी समितीमध्ये ग्रामपंचायतींमध्ये बोगस भरती केल्यावर शिक्कामोर्तब झाले. महापालिकेने ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतलेल्या दप्तरांमध्ये ४६ कर्मचार्‍यांची नावे आढळली नाहीत. तोपर्यंत महापालिकेनेही Pune Municipal Corporation (PMC) ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना महापालिकेमध्ये नेमणूक दिली नव्हती. एवढेच नाही तर पुर्वीपासून काम करणार्‍या कर्मचार्‍यांचेही वेतन दिले नाही. जिल्हा परिषदेने चौकशी अहवाल महापालिकेला दिला असून त्यानुसार महापालिकेने कर्मचार्यांना नियुक्ती देण्यास सुरूवात केली आहे. चौकशी अहवालानुसार तब्बल 46 कर्मचार्‍यांची बोगस भरती झाल्याचे समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी या 46 कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता 600 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

राज्य शासनाने 23 गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण पडण्याच्या कालावधीत ‘राजकिय’ वरदहस्तामुळे ग्रामपंचायतींवर दबाव आणून बोगस भरती झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे. या सर्व कर्मचार्‍यांना आरोग्य, साथरोग नियंत्रक, सफाई कर्मचारी, दिवाबत्ती कर्मचारी, कर वसुली कर्मचारी, चालक आणि पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून अगदी अडीच ते सहा हजार रुपये वेतनावर नेमले होते. महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या कर्मचार्‍यांना अगदी सातव्या वेतन आयोगानुसार पाच आकडी पगार होणार होता.

 

ग्रामपंचायत          –       कमी केले जाणारे कर्मचारी

सुस                                     –         40

बावधन बुद्रुक                      –        55

किरकटवाडी                       –        5

कोंढवे-धावडे                       –       64

न्यू कोपरे                              –      40

नांदेड                                   –     37

खडकवासला                      –       56

नऱ्हे                                    –       85

होळकरवाडी                     –        37

औताडे हांडेवाडी               –         28

वडाचीवाडी                       –         14

नांदोशी सणसनगर            –        19

मांगडेवाडी                        –        36

भिलारेवाडी                        –       15

गुजर निंबाळकरवाडी         –      34

जांभूळवाडी कोळेवाडी       –     45

वाघोली                               –    6

 

 

Web Title :-  Pune Corporation Employees | PMC Commissioner Vikram Kumar will be Dismisse more than 600 employees from 23 villages covered by Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC-HSC Board Exams | 10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

 

Multibagger Sugar Stock | 27 रुपयांच्या शुगर स्टॉकने वाढवला गुंतवणुकदारांचा गोडवा, वर्षभरात 3 पट मिळाला रिटर्न

 

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 ‘बोगस’ कर्मचारी ‘बडतर्फ’; सर्वाधिक बोगस भरती बावधन बु. आणि नर्‍हे ग्राम पंचायतीमध्ये झाल्याचे उघड