Pune Corporation GB | अनधिकृत केबल शोधण्यापूर्वी केबल कंपन्यांना नोटीस पाठवून ‘डिक्लेरेशन’ मागवणार – महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation GB | शहरातील इंटरनेट व TV ओव्हरहेड व अंडरग्राऊंड अनधिकृत केबल दंड आकारून नियमित करण्यापूर्वी सर्व केबल कंपन्यांना नोटीस पाठवुन ‘डिक्लेरेशन’ घेण्याचा निर्णय आज सर्वसाधारण सभेत (Pune Corporation GB) घेण्यात आला.

शहरातील सर्व ओव्हरहेड केबल शोधून त्या दंड आकारून नियमित करण्याचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेपुढे (Pune Corporation GB) मान्यतेसाठी होता. या प्रस्तावानुसार शहरातील सर्व केबल चे सर्वेक्षण करून अहवाल तयार करून ओव्हरहेड केबल धारकांकडून प्रचलित खोदाई दर अधिक 10 टक्के दंड आकारून नोटीस दिल्यानंतर दंड भरून एक वर्षाच्या आत केबल अंडर ग्राउंड करणे असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मान्यता देताना सर्वसाधारण सभेत (Pune Corporation GB) जोरदार चर्चा झाली.

अविनाश बागवे (corporator avinash bagwe) म्हणाले ,ओव्हरहेड केबल शुल्क आकारून नियमित करण्यामुळे विद्रुपीकरण कमी होईल आणि पालिकेलाही उत्पन्न मिळेल. परंतु केबल काढल्यावर पर्यायी व्यवस्था अर्थात डक्ट विकसित केले नाहीत. दुसरे मोठ्या कंपन्यांना परवडेल पण छोट्या केबल व्यावसायिकांना परवडणार ? ऐअरटेल, रिलांयन्स कंपनी प्रत्यक्ष परवानगी पेक्षा अधिक केबल टाकत आहेत.

अरविंद शिंदे (corporator arvind shinde) यांनी हा अर्धवट प्रस्ताव आहे. डीएसआर वाढला आहे. सुभाष जगताप (corporator subhas jagtap) म्हणाले, मोठे उत्पन्न मिळणार असेल तर वेगळा विभाग केला पाहिजे. सल्लागाराकडून डिपॉझिट घ्यावे. तसेच केबल कंपन्यांकडून declaration घ्यावे किती केबल टाकल्या आहेत. डॉ. सिद्धार्थ धेंडे (corporator dr siddharth dhende) म्हणाले सर्व केबल कंपन्या या सर्विस पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. म्हणून त्यांच्यावर कारवाईत अडथळे येणार आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव चांगला आहे. केबल कंपन्याना दंड भरून केबल अंडरग्राऊंड करण्यास वेळ मिळणार आहे.

आबा बागुल (corporator aba bagul) म्हणाले, आपण सर्वे न करता प्रस्ताव ठेवला आहे.
बावीसशे की. मी. रस्ते आहेत मग किती रस्ते खोदण्यासाठी परवानगी मागितली याची माहिती घेतली नाही.

पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी (PMC V.G. Kulkarni) म्हणाले सल्लागाराला एक वर्षात सर्वे करायचे बंधन घातले आहे.
त्या अहवालावरून प्रत्येक कंपन्यांना नोटीस देणार आहोत.
परवानगीपेक्षा अधिक खोदाई करण्यात आल्याचे लक्षात आल्यास तीनपट दंड आकारण्यात येणार आहे.
(Pune Corporation GB) महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol)
यांनी सर्व केबल कंपन्यांनी किती केबल टाकली आहे त्याचे ‘डिक्लेरेशन’ घेणार आहोत.

 

Web Title :- Pune Corporation GB | Before finding the authorized cable, notice will be sent to the cable companies and a ‘declaration’ will be sought

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी

Mutual Funds SIP | ‘या’ ब्ल्यूचिप फंड्सने शानदार दिला रिटर्न; जाणून घ्या 5 वर्षात किती केली ‘कमाई’

Dilip Walse Patil | समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)