Pune Corporation | पुणे महापालिका सुरू करणार ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’ची सुविधा ! मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंत्यविधीसाठी लागणारा पास (Funeral pass) आणि मृत्यूचा दाखला (Death certificate) लवकरात लवकर मृताच्या नातेवाईकांना उपलब्ध व्हावा यासाठी पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) लवकरच ऑनलाईन पास देण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. नुकतेच कोरोना काळामध्ये मृतांचे प्रमाण वाढल्यानंतर प्रशासकिय प्रक्रिया करण्यास लागणारा विलंब टाळण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Corporation) अंत्यविधीसाठी लागणारे पासेस ऑनलाईन देण्याची व्यवस्था केली होती. या यंत्रणेत आणखी सुटसुटीतपणा आणून कायमस्वरूपी ऑनलाईन सेवा देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (PMC Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar) यांनी दिली.

 

पुणे महापालिकेने (Pune Corporation) जन्म- मृत्यूचे दाखले ऑनलाईन देण्यास यापुर्वीच सुरूवात केली आहे. यापुढील टप्प्यामध्ये अंत्यविधीसाठी लागणारे पासेसही ऑनलाईन देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. व्यक्तिच्या मृत्यूनंतर रुग्णालयातूनच महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन पास मिळणार आहे. हा पास संबधित स्मशानभूमीतील अधिकृत कर्मचार्‍याला दाखविल्यानंतर तो महापालिकेच्या संकेतस्थळावर खातरजमा करून अंत्याविधीस परवानगी देईल. यामुळे दिवसाच नव्हे तर रात्री अपरात्री देखिल पासेस मिळविण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागणार नाही.

 

 

सध्या महापालिका (PMC Hospitals) व शासकिय रुग्णालये (Government Hospitals) तसेच क्षेत्रिय कार्यालयातून अंत्यसंस्काराचे पासेस उपलब्ध करून दिले जातात.
यानंतर या नोंदी महापालिकेच्या कसबा पेठेतील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाकडे जातात.
तेथे नोंद झाल्यानंतर मृत्यूचे दाखले उपलब्ध करून दिले जातात.
परंतू या प्रक्रियेसाठी कमीतकमी २१ दिवसांचा कालावधी लागतो.
अनेकदा रात्रीच्यावेळी कार्यकर्ते अंत्यसंस्काराचा पास मिळविण्यासाठी
अगदी विश्रामबाग वाड्यातील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयापासून आपआपल्या
परिसरातील शासकिय व महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कागदपत्र घेउन हेलपाटे मारतात.
याठिकाणी पास घेण्यासाठी आलेल्या व्यक्तिंची ओळखपत्र, आधाराकार्डची झेरॉक्स मागितली जाते.
दिवसा ठीक परंतू रात्रीच्यावेळी झेरॉक्स काढण्यासाठीही शोधाशोध करावी लागते यामध्ये मोठा कालापव्यय होतो.
यावर उपाय म्हणून महापालिकेने ऑनलाईन पासेस देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

 

शहराचा विस्तार आणि शहरातील स्मशानभूमी व दफनभूमींचीही संख्या अधिक आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षिततेसोबतच आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आज संबधित विभागांच्या अधिकार्‍यांसोबत पाहाणी केली. या पाहाणीनंतर झालेल्या बैठकीमध्ये नियोजनाच्यादृष्टीने विस्तृत चर्चा झाली. त्यानुसार लवकरच शहरातील सर्वच स्मशानभूमी व दफनभूमींमध्ये कामे हाती घेण्यात येणार आहेत.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation to launch ‘Online Funeral Pass’ facility! PMC Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar give information

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा