Pune Corporation | तळजाई हिल टॉप हिल स्लोपवरील ‘बहुचर्चित’ जैवविविधता उद्यानाचा मास्टरप्लॅन मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | तळजाई टेकडीवरील (Taljai hill) ‘हिल टॉप हिल स्लोप’वरील (Hill top hill slope) बहुचर्चित नियोजित ‘जैवविविधता उद्यान’ उभारण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे (standing committee ) ठेवण्यात आला आहे. वेगवेगळी वैशिष्ठये असलेल्या सात उद्यानांचे सेंट्रल पार्क, जॉगींग व सायकल ट्रॅक, हरित स्कूल, पक्षी निरीक्षण, खुले ऍम्फी थिएटर आदी सुविधांची रेलचेल असलेल्या या उद्यानासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्च येणार आहे. पर्यावरण प्रेमींचा विरोध आणि स्थानीक नगरसेवकांमधील (Pune Corporation, corporator) संघर्षामुळे मागील तीन वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाला येत्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता मिळणार? याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

तळजाई टेकडीवरील हिल टॉप हिल स्लोपचे आरक्षण असलेली सुमारे १०० एकर जमिन प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर महापालिकेच्या (Pune Corporation) ताब्यात आली आहे. यापैकी बहुतांश जमिनीचे संपादन झाले असून अद्याप काही जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या जागेवर जैववैविध्य उद्यान उभारण्यासाठी स्थानीक ज्येष्ठ नगरसेवकांकडून अनेकवर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तसेच स्थानीक आमदारांनीही यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दरम्यान २०१८ मध्ये या जैववैविध्य उद्यानाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम आर्किटेक्ट आनंद उपळेकर (Architect Anand Uplekar) यांच्याकडे सोपविण्यात आले.

 

उपळेकर यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार एका माननीयांनी त्यांच्या निधितून क्रिकेटचे मैदानही विकसित केले. तसेच अन्य काही कामे सुरू केल्यानंतर स्थानीक नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले. हे वाद एवढे टोकाचे होते की पोलिस ठाण्यापर्यंतही गेले. दरम्यान, आयुक्तांसमोर आराखड्याचे सादरीकरणादरम्यानही माननीयांमध्ये एकमत न झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane), स्थानीक नगरसेवक आबा बागुल (Corporator Aba Bagul), सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap), महेश वाबळे (Corporator Mahesh Wable) आदी यावेळी उपस्थित होते. या सादरीकरणादरम्यान अजित पवार यांनी या आराखड्यास महापालिकेने आवश्यक मान्यता दिल्यास शासन मदत करेल आश्‍वासन देत सर्व मान्यता घेण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, मागीलवर्षी मार्चमध्ये आलेल्या कोरोनामुळे महापालिकेने आरोग्य यंत्रणेवर अधिक फोकस केले. यावर्षी देखिल अगदी जून महिन्यापर्यंत सर्व यंत्रणा कोरोना विरोधातील लढाईतच व्यग्र होती. महापालिकेचे कामकाज सुरळित झाल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी हा मास्टरप्लॅन मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या प्रकल्पासाठी साधारण १२० कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाची व्याप्ती तसेच एका आर्थिक वर्षात एवढी मोठी तरतूद करता येणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प विकसित करण्यात येईल.

जैवविविधता उद्यानामध्ये प्रत्येक वयोगटांचा विचार करून मनोरंजन, व्यायाम आणि दैनंदीन गरजा तसेच जैवविविधता व पर्यावरणीय दृष्टीकोन ठेउन आराखडा तयार करण्यात आला आहे.

 

जैवविविधता उद्यानाची वैशिष्टे

सेंट्रल पार्कमध्ये नक्षत्र उद्यान, मसल्यांच्या झाडांचे उद्यान, सुवासिक उद्यान, बांबु उद्यान, फुलांचे उद्यान जैविक वनस्पती उद्यान, रानमेवा उद्यानाचा समावेश असेल.

३.१६ कि.मी. लांबीाच जॉगिंग व सायकल ट्रॅक

हरित स्कूल प्रशिक्षण केंद्र.

पक्षांचा अधिवासासाठी रानमेवा उद्यान व पक्षी निरीक्षण केंद्र

खुले ऍम्फी थिएटर

स्थानिक वनस्पती व प्रजाती संरक्षण व संवर्धन प्रकल्प

पार्किंगची व्यवस्था

सौर उर्जेचा वापर

महिलांसाठी राखीव मैदान व व्यायाम सुविधा

नागरिकांना बसण्यासाठी गझिबो व पॅगोडा

लहानमुलांसाठी साहसी खेळञ्

नैसिर्गिक तळे

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी ई रिक्षाची सुविधा

वृक्ष लागवडीसाठी आंबिल ओढ्याचे पाणी फिल्टर करून वापरण्याचा प्रकल्प

स्थानीक प्रजातींच्या वृक्षांची नर्सरी

फुडकोर्ट.

 

Web Title : Pune Corporation | Standing Committee approves masterplan of ‘much talked about’ biodiversity park on Taljai Hill Top Hill Slope

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

KCC | खुशखबर ! मोदी सरकार सर्व शेतकर्‍यांना देणार ‘किसान क्रेडिट कार्ड’, ‘इथं’ करा अर्ज आणि घ्या ‘लाभ’, जाणून घ्या प्रोसेस

Beed Crime | दुर्देवी ! मायलेकीचा विहीरीत बुडुून मृत्यु; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मिठ्ठी मारली होती

Bhagatsingh Koshyari | … अन् राज्यपालांनी भर स्टेजवर महिलेचा मास्क खाली ओढला (व्हिडीओ)