Pune Corporation | ड्रेनेज सफाईसाठी 4 जेटींग मशीन 7 वर्षे भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने एक महिना पुढे ढकलला

‘देवदूत’ रेस्न्यू वाहने पुरविणार्‍या कंपनीच निविदा असल्याने ‘वादाच्या ’ भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | आपत्तीच्यावेळी गंभीर प्रसंगातून मानवी जीवाची सुटका करण्यासाठी महापालिकेला (Pune Corporation) 6 ‘देवदूत’ वाहने पुरविणार्‍या मे. आयर्न पंप्स ऍन्ड एन्वहायरो सोल्युशन प्रा.लि. या कंपनीची (iron pumps and enviro solutions pvt.) 34 कोटी 93 लाख रुपयांची जेटींग मशीन भाडेतत्वावर पुरविण्याची आणखी एक निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे (PMC standing committee) आली आहे. विशेष असे की ‘देवदूत’ च्या किंमतीवरून 2017 मध्ये मोठा गदारोळ झाल्यानंतर चौकशीही लावण्यात आली होती. मात्र, अचानकपणे ‘धुराळा’ खाली बसलाच आणि चौकशी अहवालही ‘थंड बस्त्यात’ गेला होता. परंतु पुन्हा त्याच कंपनीची निविदा आल्याने आल्याने ही निविदा पुन्हा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.

ड्रेनेज लाईन साफसफाईसाठी 12 के.एल. क्षमतेचे सक्शन कम जेटींग मशिन सात वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्यासाठी प्रशासनाने निविदा काढली होती. यामध्ये मे. आयर्न पंप्स ऍन्ड एनव्हायरो सोल्युशन प्रा.लि.ची निविदा 8 टक्के जादा दराने आली तर दिल्लीच्या मे. मेट्रो वेस्ट हॅन्डलिंग प्रा. लि. या कंपनीची निविदा 12 टक्के जादा दराची आहे. यामुळे कमी दराची मे. आयर्न पंप्स कंपनीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली. पुर्वगणन पत्रानुसार या कंपनीची निविदा अधिक असल्याने प्रशासनाने बारगेन केल्यानंतर कंपनीने आणखी एक टक्का रक्कम कमी करण्याची तयारी दर्शविली आहे. यानुसार सात वर्षासाठी 4 जेटींग मशिनकरिता तब्बल 34 कोटी 93 लाख रुपये देण्यात येणार आहेत. परंतू 13 सप्टेंबरच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनाने ऐनवेळी मान्यतेसाठी ठेवलेली ही निविदा स्थायी समितीने एक महिना पुढे ढकलली आहे.

दरम्यान, या कामाची निविदा काढली त्याचवेळी विरोधी पक्षांनी रान उठवायला सुरुवात केली आहे.
चार जेटींग मशीन दिर्घकाळ भाडेतत्वावर घेण्यापेक्षा विकत घेतल्यास परवडत असताना प्रशासन का घेत आहेत? असा प्रश्‍न विरोधक उपस्थित करत आहेत.
तसेच या कंपनीकडून यापुर्वी घेतलेल्या ‘देवदूत’ वाहनांच्या खरेदीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? हा अहवाल उघड करावा,
अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. नुकतेच महापालिकेत (Pune Corporation) बहुद्देशीय कामासाठी दीड हजार सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने घेण्याची निविदा एका भाजप आमदाराशी निगडीत कंपनीला देण्याचा निर्णय घेतल्यावरून सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका झाली होती.
यामुळेच प्रशासनाने जेटींग मशीनचा (jetting machine) प्रस्ताव अतित्वर्य या शिर्षकाखाली आणला तरी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) यांनी तो एक महिना पुढे ढकलल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Web Title :- Pune Corporation | Standing Committee postpones proposal to lease 4 jetting machines for drainage cleaning for 7 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Crime | जळगावमधील धक्कादायक घटना; लग्नाचे आमीष दाखवून डॉक्टर तरुणीवर परिचारकाकडून अत्याचार

Khadakwasla Constituency | खडकवासला मतदार संघातील तब्बल 32 हजार 124 मतदारांची नावे वगळली जाणार

Home Loan Tips | त्या 5 चूका, ज्या केल्याने रिजेक्ट होऊ शकते तुमचे ‘होम लोन अ‍ॅप्लीकेशन’, जाणून घ्या