Pune Corporation | सर्वच वाहनतळ एकाच ठेकेदाराला देण्याच्या निविदेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही ‘प्रतिसाद’ नाही; ‘झोन’निहाय ‘ग्रुप’ करून स्वतंत्र निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या हालचाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील महापालिकेच्या (Pune Corporation) मालकिचे ३० वाहनतळ एकाच ठेकेदाराला चालविण्यास देण्याच्या निविदेला (Tender) चार वेळा मुदतवाढ देउनही प्रतिसाद लाभला नाही. यामुळे झोननिहाय ग्रुप करून पार्किंग चालविण्यास देण्याच्या निविदा काढण्याचा विचार प्रशासन (Pune Corporation) पातळीवर सुरू झाला आहे.

पुणे महापालिकेने (Pune Corporation) शहराच्या विविध भागामध्ये ३० ठिकाणी वाहनतळ (Parking) उभारले आहेत.
या वाहनतळांचे संचलन खाजगी ठेकेदारांमार्फत केले जाते.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हे सर्व वाहनतळ एकाच ठेकेदार कंपनीला चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली होती.
मर्जितील एकाच ठेकेदार कंपनीला सर्व वाहनतळ चालविण्यास देण्यामागे एका मोठ्या राजकिय पक्षाच्या पदाधिकार्‍याचे मनसुबे असल्याने यावर जोरदार टिकाही झाली होती.
या विरोधात शहरातील अन्य वाहनतळ ठेेकेदारांनीही एकजूट दाखवत प्रसंगी न्यायालयीन लढयाचाही इशाराही दिला होता.

मात्र, या निविदेला चारवेळा मुदतवाढ देउनही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाने अन्य पर्यायांची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने भौगोलिक झोन करून त्या झोनमधील वाहनतळांचा एक ग्रुप करून निविदा काढण्याचा पर्याय पुढे करण्यात आला आहे.  वाहनतळ चालविणार्‍या ठेकेदारांना वाहनतळावर अत्याधुनिक कॅमेरे तसेच संगणीकृत तिकीट व्यवस्था राबविणे बंधनकारक करणे. नियमबाह्य दरआकारणी केल्यास ठराविक तक्रारींनंतर कंत्राट रद्द करणे अशा विविध अटींचा समावेश करण्याचेही नियोजन असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

हे देखील वाचा

Ration Card | रेशन कार्डमध्ये अपडेट करा स्वतःचा मोबाइल नंबर, नेहमी मिळेल ‘लाभ’; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

Pune Crime | मराठे ज्वलर्स फसवणूक प्रकरण : मंजिरी मराठेसह कौस्तुभ मराठेंना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corporation | There is no ‘response’ to the tender for awarding all the parking lots to the same contractor even after 4 extensions; Movements of administration to issue independent tenders by ‘zone’ wise ‘group’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update