कैद्याला वैद्यकीय उपचार न देणाऱ्या येरवडा कारागृहाला न्यायालयाने सुनावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – त्रास होत असतानाही पोलिसांनी तीन आठवड्यापासून तज्ञ डॉक्टरांकडे नेले नसल्याची तक्रार येरवडा कारागृहात असलेला आरोपी महेश राऊत याने न्यायालयात केली. त्यावर न्यायालयानेही कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला रुग्णालयात नेणार का? असा सवाल करत न्यायालयाने करागृह प्रशासनाला सुनावले. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून महेश राऊत सध्या येरवडा कारागृहात आहे.

एल्गार परिषद आयोजन आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी शोमा सेन आणि अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान राऊत याने न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. महेश राऊत याने न्यायालयास सांगितले की, मागील अनेक दिवसांपासून माझ्या पोटात वेदना होत आहेत. त्यावर दर सोमवारी तज्ञ डॉक्टरांना भेटून उपचार घ्यावे, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र मागील तीन आठवद्यापासून डॉक्टरांकडे नेण्यात आले नाही. यावर कारागृह प्रशासनाने सांगितले की, महेश राऊत याला ससूनला नेण्यासाठी एस्कॉट उपलब्ध होत नाही. एस्कॉट येईपर्यंत संबंधित डॉक्टरांची वेळ संपते, त्यामुळे ते घरी जातात. पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर न्यायालयाने मात्र नाराजी व्यक्त करत कैद्याचा मृत्यू झाल्यावर रुग्णालयात नेणार का? असा सवाल केला. तसेच कारागृह प्रशासनाने स्वत:चे  एस्कॉट घेवून त्याला त्वरीत रुग्णालयात न्यावे, असे आदेश दिले.

धक्कादायक… पुण्यात विनयभंग करणाऱ्यास प्रतिकार केल्याने महिलेवर चाकू हल्ला

अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी मला चित्रकलेची आवड असल्याचे सांगत रंगीत पेन्सील, रुमाल, पुस्तके, फोल्डर, बेडशीट, डिक्शनरी आदी साहित्य देण्यात यावे यासाठी अर्ज केला होता.  त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बेडशीट देता येणार नाही असे सांगण्यात आले. परंतु असे असले तरी आणखी दोन ब्लँकेट पुरवण्यात येतील असे सांगण्यात आले. दरम्यान शोमा सेन यांच्या जामीनावरील युक्तीवाद पुर्ण झाला असून आज (शुक्रवारी) तर गडलिंग यांच्या जामीनावर १४ नोव्हेंबरला निर्णय होणार आहे.

जाहिरात