Pune Crime | लग्नाचा शगुन पडला 11 लाखांना; नायजेरियन फ्रॉडमध्ये आय टी इंजिनिअर तरुणीची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जीवनसाथी डॉट कॉम (jeevansaathi) या विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झालेल्याने लग्नाची (Marriage) मागणी घालून तिला नेदरलँडवरुन (Netherlands) शगुन पाठविला. तो सोडवून घेण्याच्या नादात आय टी इंजिनिअर (IT Engineer) तरुणीला सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) ११ लाख १६ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातला. (Pune Crime)

 

याप्रकरणी विमाननगरमध्ये राहणार्‍या एका २९ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७९/२२) दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी पासून २४ जुन २०२२ पर्यंत घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आय टी इंजिनिअर आहेत. त्यांनी विवाहासाठी जीवनसाथी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यातून तिची एकाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी व्हॉटसअ‍ॅप व्हॉईस कॉलद्वारे संपर्क साधला. आपण नेदरलँड येथे असून फिर्यादीबरोबर लग्नास तयार असल्याचे सांगितले. त्यासाठी लग्नाकरिता शगुन पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना फेब्रुवारीमध्ये कस्टम असे नाव असलेल्या मोबाईलवरुन फोन आला. तुमचे पार्सल आले आहे. त्याची कस्टम ड्युटी (Customs Duty) भरायची असल्याचे सांगून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी त्याला भुलून पैसे भरत गेल्या. ११ लाख १६ हजार रुपये भरल्यानंतरही
पार्सल न मिळाल्याने त्यांना आपली फसवणुक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली असून
पोलीस उपनिरीक्षक ढावरे (Sub-Inspector of Police Dhaware) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 11 lakhs got marriage omen; Young IT engineer cheated in Nigerian fraud

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा