Sudhir Mungantiwar | ‘…मग तुम्ही मोदींचा फोटो का वापरला ?’, सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena Chief Uddhav Thackeray) इतरांना म्हणतात की, माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या. पण मग पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही 2019 च्या निवडणुकीवेळी (Election) वरळी मतदारसंघातील बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांचा फोटो का वापरला, असा सवाल भाजप नेते (BJP Leader) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या पहिल्या मुलाखतीचा पहिला भाग आज (मंगळवार) प्रसिद्ध झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गट (Shinde Group) व भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर या टीकेला सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिले.

 

उद्धव ठाकरे म्हणतात की, विरोधी पक्ष संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा. ते इतरांना गद्दार म्हणतात.
मग 24 ऑक्टोबर 2019 ला तुम्ही काय केले ? तुम्ही विधानसभेत असंसदीय शब्द वापरता, आम्ही विरोधकांच्या उरावर बसू, असे म्हणता.
आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडून आम्हाला संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे.
उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, सुडाचे राजकारण नको.
पण नितेश राणे (Nitesh Rane), नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावरील कारवाई, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणून पाहणाऱ्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना 14 दिवस जेलमध्ये टाकून तुम्ही काय केलेत, असा सवाल सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उपस्थित केला.

मागील 60 वर्षामध्ये मुख्यमंत्री काम करायचे, त्यांची बातमी होत नव्हती.
आईने मुलासाठी स्वयंपाक केला, तर त्यामध्ये बातमी करण्यासारखे काहीच नसते.
मात्र, 60 वर्षामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री मंत्रालयात गेल्याची बातमी झाली, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | if uddhav thackeray told others not to use balasaheb thackeray photo then why he used pm modi photo in 2019 elections says bjp sudhir mungantiwar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा