Pune crime | परराज्यातील दोन अट्टल वाहनचोरांकडून पुण्यातील 11 दुचाकी जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune crime | पुणे शहरात वाहनचोरीच्या (Vehicle Theft) घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकने (Anti Dacoity And Anti Vehicle Theft Squad 1) दोन परराज्यातील अट्टल वाहन चोरांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पुण्यातून चोरलेली (Pune crime) 11 वाहने जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.4) हिंगणे – सिंहगड (Hingane-Sinhagad Road) येथे करण्यात आली.

 

गणेश हुच्चापा गुडळी (रा. गुडळी, ता. सिंदगी, कर्नाटक), रोहित राहुल काळे (रा. बंखलकी, कर्नाटक – Karnataka) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल वाहनचोरांची नावे आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी सिंहगड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) ताब्यात देण्यात आले आहेत. आरोपींनी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 5, दत्तवाडी (Dattawadi Police Station) 3, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishrambaug Police Station) हद्दीतून एक आणि इतर ठिकाणाहून दोन वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

सिंहगड परिसरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील अंमलदारांना बातमीदार मार्फत समजले की, दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी गणेश गुडळी हा सध्या पुण्यात (Pune crime) असून तो अट्टल वाहनचोर आहे. तो हिंगणे – सिंहगड या ठिकाणी वाहन चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने आरोपींनी पुणे शहरातून चोरलेली 1 लाख 64 हजार रुपये किमतीची 11 दुचाकी वाहने जप्त केली. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe),
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Senior Police Inspector Ajay Waghmare)
यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narke),
सहायक पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख (ASI Shahid Sheikh),
पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, निलेश शिवतरे, सुमित ताकपेरे, चंद्रकांत जाधव, ऋषिकेश कोळप, गणेश पाटोळ,
नारायण बनकर, अक्षय गायकवाड, शिवाजी सातपुते, महिला पोलीस अंमलदार डोंगरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune crime | 11 two wheelers seized in Pune from two notorious vehicle thieves Pune Police Crime Branch

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा