Pune Crime | दुर्देवी ! 17 वर्षाच्या मुलाचा विहीरीत बुडून मृत्यू

पुणे : पोलीसमाना ऑनलाइन – Pune Crime | विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षाच्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) कोरेगाव मूळ ग्रामपंचायत (Koregaon Mul Grampanchayat) हद्दीतील कोलते वस्ती येथे घडली आहे. दयानंद प्रकाश रणदिवे Dayanand Prakash Ranadive (वय-17 रा. कळंब जि. उस्मानाबाद-Osmanabad) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद हा कोरेगाव मूळ या ठिकाणी नातेवाईकांकडे आला होता. नातेवाईकांनी त्यांची दोन मुले व दयानंद याला गुरे राखण्यासाठी पाठवले होते. तिघेजण गुरे राखण्यासाठी गेल्यानंतर तिघेजण कोलते वस्ती येथील एका विहीरीवर (Well) पोहण्यासाठी (Swimming) दुपारी दोनच्या सुमारास गेले होते. परंतु दयानंदला पोहता येत नसताना तो पाण्यात उतरला. तसेच त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने व विहीरीत असलेल्या गाळामुळे त्याला पाण्यातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे त्याठिकाणी असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. (Pune Crime)

 

दयानंदचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेड (Fire Brigade), पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास दयानंदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale), पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde), सदाशिव गायकवाड, पोलीस शिपाई किशोर कुलकर्णी, भगत, कोरेगाव मूळच्या पोलीस पाटील वर्षा कड, स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते.

 

Web Title :- Pune Crime | 17 year old boy death by drown in well doregaon mul grampanchayat haveli pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचा नवीन दर

 

MLA Madhuri Misal | खाजगी सोसायट्यांमध्ये शासन आणि महापालिकेच्या निधीतून कामे करण्यास परवानगी मिळावी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार माधुरी मिसाळांनी केली मागणी (Video)

 

PMC Job Vacancy 2022 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! पुणे महापालिकेत 200 अभियंत्यांसह 500 पदांसाठी भरती