पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे एका 18 वर्षाच्या तरुणीने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Suicide In Pune) घटना घडली आहे. तृप्ती सुनिल गाडगे Trupti Sunil Gadge (वय-18 रा. वाडारोड ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही घटना सोमवारी (दि.23) रोजी (Pune Crime) घडली आहे.
या घटनेबाबत तृप्ती गाडगे हिचे चुलते दत्तात्रय किसन गाडगे Dattatraya Kisan Gadge (रा. मोशी आरटीओ शेजारी, अंबिका बिल्डिंग, मोशी प्राधिकरण) यांनी खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्तीचे वडील सुनिल तीची आई मनिषा यांच्यासह वाडारोड येथे राहत होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणाने तृप्ती हिने बेडरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आई वडीलांना मुलीने गळफास घेतल्याचे समजले. तिला तातडीने शहरातील बांबळे हॉस्पिटल (Bamble Hospital) व तेथून युनिकेअर हॉस्पिटल चाकण (Unicare Hospital Chakan) येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | 18 year old girl commits suicide by hanging in rajgurunagar pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
eAadhaar Card काय आहे, त्याचे फायदे कोणते आणि ते कसे काम करते? सर्वकाही जाणून घ्या