Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office MIS | आजच्या काळातही लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक (Post Office MIS) करणे अधिक सुरक्षित आणि चांगले मानतात. जर तुम्ही दरमहा गॅरंटेड इन्कमचा पर्याय शोधत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत एकरकमी रक्कम जमा करून दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळते. (Post Office Monthly Income Scheme)

 

यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 4,950 रुपये कसे मिळवू शकता ते जाणून घेवूयात…

 

सध्या नोकरदार लोकांना पेन्शनची जास्त काळजी असते. म्हणूनच ते अशा गुंतवणुकीच्या योजनेच्या शोधात असतात जी सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शनला पर्याय म्हणून काम करेल. अशावेळी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

 

पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला दरमहा सुमारे 5000 रुपयांचे उत्पन्न देईल आणि भविष्यातील चिंता देखील कमी करेल.

 

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न खात्यात फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. त्याची मॅच्युरिटी पाच वर्षांची आहे. म्हणजेच पाच वर्षांनंतर तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळेल. हे खाते पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत किमान रु. 1,000 मध्ये उघडता येते. (Post Office MIS)

किती करू शकता गुंतवणूक :
या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवता येतात. एका खात्यात कमाल 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवता येतात. सर्व खातेदारांचा संयुक्त खात्यात समान हिस्सा असतो.

 

इतके मिळत आहे व्याज :
या पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणुकीवर, तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज मिळते. रिटर्नचा हा दर बचत खात्यात जमा केलेल्या किंवा निश्चित केलेल्या रकमेच्या तुलनेत जास्त आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर ग्राहकाला दर महिन्याला व्याज मिळते.

 

दर महिन्याला असे मिळतील 4,950 रुपये :
सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 6.6% व्याज मिळत आहे. जर एखाद्या खातेदाराने जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक 29,700 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, एका खातेदाराला दरमहा 2,475 रुपये व्याज मिळेल.

 

त्याच वेळी, संयुक्त खातेदाराला 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 59,400 रुपये व्याज मिळेल.
अशा प्रकारे, जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त एमआयएस खाते उघडले आणि 9 लाख रुपये गुंतवले
तर तुम्हाला दरमहा 4,950 रुपये मिळतील.

जाणून घ्या मॅच्युरिटी कालावधी :
पोस्ट ऑफिसचे मासिक उत्पन्न खाते उघडल्यानंतर पाच वर्षानंतर,
तुम्ही विहित नमुन्यात अर्ज भरून आणि तो संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करून तुमचे खाते बंद करू शकता.
मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, गुंतवणुकीची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल.

 

Web Title :- Post Office MIS | city post office scheme 4950 per month will be available in this scheme of post office by investing only once

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून ‘हामरीतुमरी’वर आलेल्या 5 दाम्पत्याच्या संसारात पुन्हा ‘गोडवा’; जनता दरबारात 106 तक्रारींचे निवारण

 

Share Market | घसरणार्‍या बाजारात पैसे कमावण्याची चांगली संधी, सध्या खरेदी करू शकता ‘या’ 7 कंपन्यांचे शेअर

 

Sindhudurg Crime | पुण्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा तारकर्लीच्या समुद्रात बूडून मृत्यू