Tata Group | रू. 1170 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, आता डाव लावल्यास होईल जबरदस्त नफा, एक्सपर्ट म्हणाले – ‘खरेदी करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही टाटा समूहाच्या (Tata Group) शेअर्सवर डाव लावण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही टाटा केमिकल लिमिटेड (TATA chemical limited) च्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. आगामी काळात टाटा केमिकल्सचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करू शकतात. कंपनीच्या शेअर्सवर ब्रोकरेज कंपन्या बुलीश आहेत आणि खरेदीचा सल्ला देत आहेत. (Stock To Buy)

 

आनंद राठी यांनी शेअरची टार्गेट प्राईस रू. 1,170 प्रति शेअर ठेवली आहे. सध्या कंपनीचा शेअर 965 रुपयांवर आहे. म्हणजेच, आता डाव लावून गुंतवणूकदार 21.24% नफा कमावू शकतात.

 

एक्सपर्ट काय म्हणाले?
आनंद राठी (Anand Rathi) यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले आहे की, आम्हाला खात्री आहे की कंपनी पुढील दोन वर्षांत आपल्या महसूलात 13% सीएजीआर वाढ करेल. तसेच, आम्हाला विश्वास आहे की कंपनी खर्च कमी करेल, प्लांट प्रॉडक्शन वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय कर्ज कमी करण्याकडे लक्ष देण्यासह आले लाभ मार्जिन कायम ठेवेल.

 

कंपनी तिच्या FY22 कमाईच्या 19.6x आणि FY23E कमाईच्या 17.4x वर व्यापार करत आहे. आम्ही टाटा केमिकलवर आमचे बाय रेटींग आणि आणि रू. 1,170 प्रति शेअरच्या टार्गेट प्राईससह आपले कव्हरेज सुरू करतो. गेल्या 5 दिवसांत टाटा केमिकल्सचे शेअर्स 1.08 टक्क्यांनी घसरले आहेत. (Tata Group)

 

मात्र गेल्या महिन्यात त्यात 3.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 7.38 टक्क्यांनी वाढला आहे आणि 2022 मध्ये या वर्षी (वायटीडी) 5.76 टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनीबद्दल जाणून घ्या
केमिकल इंडस्ट्रिची टाटा केमिकल्स लिमिटेड मिड कॅप कंपनी आहे जिचे मार्केट कॅप रू. 24,660 कोटी आहे.
ही कंपनी आशियातील सर्वात मोठी सॉल्टवर्क्स तसेच जगातील तिसरी सर्वात मोठी सोडा अ‍ॅश आणि सहाव्या क्रमांकाची सोडियम बायकार्बोनेट उत्पादक आहे.

 

टाटा केमिकल्सचे दोन विभाग आहेत : बेसिक केमिस्ट्री आणि स्पेशलिटी केमिस्ट्री. ग्लास, डिटर्जंट, फार्मास्युटिकल,
बिस्किट बनवणे, बेकरी आणि इतर क्षेत्रांसाठी जगातील अनेक आघाडीचे ब्रँड कंपनीच्या बेसिक केमिस्ट्री उत्पादन लाइनवर अवलंबून आहेत.

 

Web Title :- Tata Group | tata group share tata chemical stock may go up to 1170 rupees expert bullish says buy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

 

eAadhaar Card काय आहे, त्याचे फायदे कोणते आणि ते कसे काम करते? सर्वकाही जाणून घ्या

 

Share Market | घसरणार्‍या बाजारात पैसे कमावण्याची चांगली संधी, सध्या खरेदी करू शकता ‘या’ 7 कंपन्यांचे शेअर