Pune Crime | पाण्याच्या हौदात पडून २ वर्षाच्या मुलीचा मृत्यु; सिमेंट पाईप बनविणार्‍या कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | जांभुळवाडी (Jambulwadi, Pune) येथील सिमेंट पाईप बनविणार्‍या कारखान्यातील (Cement Pipe Manufacturing Factories) पाण्याच्या हौदात पडून एका २ वर्षाच्या मुलीचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime)

याप्रकरणी विमलकुमार शिवशंकरलाल गौतम Vimal Kumar Shivshankarlal Gautam (वय २६, रा. जांभुळवाडी) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४/२३) दिली आहे. त्यानुसार, अश्रफ अली खान Ashraf Ali Khan (रा. वारजे) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळील एके आर सीसी कंपनीत ३१ डिसेबर रोजी दुपारी १२ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरी पुलाजवळ एके आर सीसी ही सिमेंट पाईप बनविणारी कंपनी आहे.
पाईप बनविल्यानंतर ते भिजविण्यासाठी जमिनीलगत पाण्याचा मोठा हौद बनविण्यात आला आहे.
या पाण्याचा हौदात कोणी जाऊ नये, म्हणून कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती.
त्यामुळे कारखान्याच्या आवारात राहणारे फिर्यादी यांची मुलगी सुरभी (वय २) ही या पाण्याच्या हौदात पडली.
हे पाहिल्यानंतर तिला तातडीने बाहेर काढण्यात आले. तिला रुग्णालयात दाखल केले.
परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Fall | ‘हेयर फॉल’च्या समस्येने असाल त्रस्त, तर असा करा कांद्याचा वापर, जाणून घ्या याचे ३ फायदे!

Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

Winter Health | हिवाळ्यात लवंग आणि काळी मिरी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक, सेवन केल्याने होईल ‘इम्यून सिस्टम’ मजबूत!