Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

पुणे / भिगवण : पोलीसनामा ऑनलाइन –  चोरीच्या अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. चोरटे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गाडी, यासारख्या अनेक चोरीच्या घटना घडत असतात. कोरोना (Corona) काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली असून या घटनेत चोरट्यांनी चक्क मासे चोरून (fish stolen) नेले आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) भिगवण पोलीस ठाण्यात (Bhigwan police station) मासे चोरोला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदार शेतकऱ्याचे 5 लाखांचे मासे चोरीला गेले आहेत.

बापूराव पवार (रा. पोंधवडी, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार यांनी त्यांच्या शेततळ्यातील 5 लाखांचे मासे चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. पवार यांच्या तक्रारीवरुन भिगवण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मासे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार बापूराव पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सायफरनिस प्रजातिचे 5 हजार आणि चिलापी जातीच्या 7 माशांचे बीज 15 महिन्यापूर्वी शेततळ्यात सोडले होते. परंतु 7 जुलै रोजी शेततळ्यातून मासे चोरीला गेल्याचे लक्षात आले. आम्ही शेतात तळे तयार केले आहे. यामध्ये मासे पालनाचा व्यवसाय सुरु केला. शेतळ्यातील माशांची योग्य पद्धतीने काळजी घेतल्याने माशांचे वजन 300 ते 500 ग्रॅमपर्यंत वाढले होते. यामुळे माशांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच काही व्यापाऱ्यांशी व्यवहार केला होता. परंतु ज्यावेळी शेततळ्याच्या ठिकाणी आम्ही मासे पकडण्यासाठी गेलो त्यावेळी तळ्यात मासे नव्हते. पुढील तपास भिगवण पोलीस करित आहेत.

Web Title :- Pune Crime | 5 lakh rupees fish stolen pune district crime registred bhigwan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल