Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चित्रपटामध्ये रस्त्याने जाणार्‍या तरुणीवर गुंडांचे टोळके येऊन छेडछाड करतात. त्यांचा म्होरक्या भर रस्त्यावरुन तिला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करतो, असे प्रसंग अनेकदा दाखविले जातात. जनता वसाहतीत (Janta Vasahat Pune) भरदिवसा हा प्रकार घडला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) अस्लम शौकत शेख (वय २१, रा. कांदेआळी, जनता वसाहत) याला अटक केली आहे.

 

याप्रकरणी १२ वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहे. शेख हा १२ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यासोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध (Physical Relation) ठेवत होता. १७ मार्च रोजी रात्री ही मुलगी घरी जात होती. यावेळी अस्लम शेख याने या मुलीचे तोंड दाबून तिला ओढत जबरदस्तीने (Pune Crime) आपल्या घरात नेले. घरातील बाथरुममध्ये (Bathroom) तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. दत्तवाडी पोलिसांनी शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | A 12 year old girl was raped by a criminal on the street all day Incident in Janata Vasahat Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा