Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षाच्या तरुणाने 15 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती; स्वारगेट पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षाच्या तरुणाने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवून तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी गुलटेकडी (Gultekdi) येथील एका १५ वर्षाच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कुलदीप मगर Kuldeep Magar Parbhani (वय २५, रा. परभणी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा असून त्याने फिर्यादीला लग्न करतो,
असे सांगून वारंवार तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली.
ती ६ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
त्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A 25-year-old man made a 15-year-old girl pregnant by luring her into marriage; FIR at Swargate Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Uday Samant | उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, काँग्रेस नेत्यासमोर रिफायनरी विरोधकाची धमकी

 

Pune Pimpri Crime | सुरक्षा रक्षकाची हॉटेल व्यावसायिकाला मारहाण, ग्राहकांच्या वाहनाची केली तोडफोड

 

Rape In Pune | धक्कादायक ! बापच ठरला नराधम; आपल्याच मुलीचे केले लैंगिक शोषण