Pune Crime | आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मोफा कायद्यान्वये पुण्यातील बिल्डरवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Crime | आर्थिक फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी मोफा कायद्यान्वये (MOFA Act) पुण्यातील बिल्डर (Builder In Pune) आणि कन्स्ट्रक्शन कंपनीच्या इतर भागीदारांवर कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

रिषभ पारसमल जैन (Rishabh Parasmal Jain) आणि बालाजी कन्स्ट्रक्शन आय कंपनीच्या इतर भागीदारांविरूध्द गुरनं 1277/2022 प्रमाणे भादंवि 406, 420, मोफा अ‍ॅक्ट 8, 13 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मयुर विलास कोठारी (32, रा. 87/689, संत नामदेव शाळेजवळ, महर्षीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सदरील गुन्हा दि. 1 जानेवारी 2015 ते 1 जानेवारी 2018 दरम्यान घडला असून तक्रार अर्जावरून दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

कोठारी यांनी सर्व सोयी सुविधायुक्त अ‍ॅमीनीटीजसह फ्लॅट खरेदी करण्याकरिता 19 लाख रूपये बालाजी कन्स्ट्रक्शन आय कंपनीच्या खात्यावरून भरले होते.
रिषभ पारसमल जैन यांनी कंपनीच्या वतीने कोठारी यांना प्रोव्हीजनल अलॉटमेंट लेटर लिहुन देवुन त्यामध्येबालाजी कन्स्ट्रक्शन आय पिसोळी सर्व्हे नं. 11, हिस्सा नं. 15,16,17,18, 18/2, 19 व 20 या मिळकतीवरील दावे 14.07 येथील ए विंगमधील फ्लॅट नं. 404 हा 36 महिन्याच्या मुदतीमध्ये देणे बंधनकारक होते. तसे असताना सुध्दा रक्कम स्विकारून फ्लॅटचा ताबा विहीत मुदतीमध्ये न देता कोठारी यांची आर्थिक फसवणूक (Fraud Case) केली. सदरील गुन्हा तक्रार अर्जावरून दाखल करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A case against a builder Rishabh Parasmal Jain in Pune under MOFA Act for financial fraud

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Subhash Desai | सुभाष देसाईंनी एक हजार कोटींचा घोटाळा केला, खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

Pune Crime | मुलुंड येथील बनावट कॉल सेंटरद्वारे महिलेची फसवणूक करण्याऱ्या आरोपीस जामीन मंजूर

Winter Session 2022 | चर्चेशिवाय, विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर…