Pune Crime | आंबेगाव पठार येथे राडा; गुंडांकडून मध्यरात्री मोटारीच्या काचा फोडून दहशत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | आंबेगाव पठार (Ambegaon Pathar, Pune) येथे गुंडांच्या (Pune Criminal) टोळक्याने मोटारसायकलवरुन येऊन पार्क केलेल्या गाड्यांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार केला. (Pune Crime)

 

याप्रकरणी श्रीगणेश दिलीप रांजणे Shriganesh Dilip Ranjane (वय ३१, रा. स्वामीनगर, आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी १० ते १५ जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव पठार येथील स्वामीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडला.

 

फिर्यादी व इतरांनी आपल्या चार चाकी गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क केल्या होत्या. त्यांच्या गल्लीमध्ये काही जण मोटारसायकलवर हॉर्न वाजवित गोंधळ घालीत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी बाहेर येऊन पाहिले असता ९ मोटारसायकलवर १० ते १५ जण जोरजोरात आरडाओरडा करीत होते. त्यांनी सिमेंटच्या ब्लॉकच्या सहाय्याने गाड्यांच्या काचांची तोडफोड केली.
फिर्यादी यांची मोटार, कालीदास गायकवाड (Kalidas Gaikwad), निलेश जाधव (Nilesh Jadhav),
प्रसन्न माने (Prasanna Mane) अशा चार कारच्या काचा फोडून नुकसान केले व ते निघून गेले.
सहायक पोलीस निरीक्षक धामणे (Assistant Police Inspector Dhamane) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A gang of gangsters ran rampant at Ambegaon Plateau;
In the middle of the night, panic was spread by breaking the windows of cars

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा