Pune Crime | जांभुळवाडीत तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आंबेगाव खुर्द (Ambegaon Khurd) येथील जांभुळवाडीमध्ये (Jambhulwadi, Pune) एका तरुणावर वार करुन त्याचा खून (Murder In Pune) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

जांभुळवाडी दरी पुलाखालील पिलरलगत जय गणेश ग्रुप फॅक्टरीकडे (Jai Ganesh Group Factory) जाणाऱ्या कच्च्या रोडवर एका पुरुषाचा मृतदेह (Dead Body) पडला असल्याची माहिती सिंहगड रोड पोलिसांना (Sinhagad Road Police) शनिवारी सायंकाळी मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केल्यावर त्या पुरुषाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष असावे. घटनास्थळाची पाहणी केल्यावर तेथे कोणताही पुरावा आढळून आला नाही. कोणीतरी या तरुणाला मारहाण (Beating) करुन त्याचा खून (Pune Murder News) केल्यानंतर वाहनातून येथे आणून टाकल्याचा पोलिसांना (Pune Police) संशय आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. सिंहगड रोड पोलिसांनी खूनाचा गुन्हा (FIR) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कथले (Assistant Police Inspector Kathale) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Youth stabbed to death in Jambhulwadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा