Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! लग्नाचा देखावा करुन तो महिलेकडून करुन घेत होता ‘काम’धंदा; उस्मानाबादच्या ज्ञानेश्वर शेळके आणि लातूरच्या तानाजी सुर्यवंशीविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) त्याने तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Threat Of Video Viral) देऊन तिला वेगवेगळ्या ग्राहकांबरोबर शारीरीक संबंध ठेवायला भाग पाडले. घरी सांगण्याची व पोलीस रेडमध्ये (Police Raid) अडकविण्याची धमकी देत बेंगलोर (Bengaluru), गोवा (Goa) इतकेच नाही तर चक्क सिंगापूरला (Singapur) ग्राहकांबरोबर पाठविले. तिने तक्रार करु नये, म्हणून तिच्यासोबत आळंदी (Alandi) येथे लग्न केल्याचा देखावा करुन तिला वेश्या व्यवसाय (Prostitute) करायला लावून महिलेची पिळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी ज्ञानेश्वर हरीदास शेळके Dnyaneshwar Haridas Shelke (वय ३०, रा. उस्मानाबाद – Osmanabad) आणि तानाजी सुधाकर सूर्यवंशी Tanaji Sudhakar Suryavanshi (वय ३८, रा. लातूर – Latur) यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०८/२२) दिली आहे. हा प्रकार २०१६ ते १७ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शेळके याने फिर्यादी सोबत ओळख वाढवून लग्न करतो, असे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरीक संंबंध ठेवले.
त्याचे व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देऊन त्याने ग्राहक आणून फिर्यादीची किंमत ठरविली.
ग्राहकांबरोबर तिला जबरदस्तीने गोवा येथे ४ दिवसाकरीता पाठविले.
त्या ग्राहकाने जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
शेळके याने फिर्यादीच्या घरी सांगण्याची व पोलीस रेडमध्ये अडकविण्याची धमकी देत वेगवेगळ्या ग्राहकांबरोबर बेंगलोर, गोवा येथे पाठवत असे.
तसेच पासपोर्ट काढून दोन वेळा सिंगापूर येथे पाठवून फिर्यादीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत तानाजी सूर्यवंशी याच्या रुमवर फिर्यादीला ठेवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली.
तेव्हा औषध देऊन तिचा गर्भपात केला. फिर्यादी तक्रार करील, या भितीने फिर्यादीसोबत आळंदी येथे लग्न केले.
त्यानंतरही तिला ग्राहकांकडे पाठवून तिची शारीरीक पिळवणूक केली.
या सर्व प्रकाराला कंटाळून तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | A shocking incident in Pune By pretending to be married he was doing work from the woman FIR against Dnyaneshwar Shelke of Osmanabad and Tanaji Suryavanshi of Latur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा