Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, 42 वर्षीय आरोपी गजाआड; येरवडा परिसरातील घटना

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका अल्पवयीन मुलीचा तिच्या शाळेजवळील बस स्टॉप आणि क्लासच्या बाहेर पाठलाग करुन तिला घर उध्वस्त करण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी (Threatened to Throw Acid) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Crime) पुण्यातील येरवडा (Yerwada) परिसरात मागील एक महिन्यापासून ते 16 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे.

याबाबत 34 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) शुक्रवारी (दि.16) फर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय रघुनाथ भोसले Vijay Raghunath Bhosale (वय-42 रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 509, 354 (ड), 504, पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime)

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे पती मागील एक वर्षापासून आरोपीसोबत बोलत नाही. याचा राग मनात धरुन आरोपीने मागील एक महिन्यापासून फिर्यादी यांना बघुन घेण्याची धमकी देत घरच्यांना बरबाद करण्याची धमकी देत होता. दरम्यान 7 डिसेंबर रोजी दत्तजयंतीनिमित्त त्यांच्या घराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत अश्लील बोलून त्यांचा विनयभंग केला.

फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्या शाळेजवळ असलेल्या बस स्टॉप येथे व तिच्या क्लासच्या बाहेर
पाठलाग केला. तसेच तिच्याकडे एकटक पाहून घर उध्वस्त करण्याची धमकी दिली.
शुक्रवारी (दि.16) घराजवळ असेल्या जीम जवळ मुलीला तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे
फिर्य़ादीत नमूद केले आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कवितके करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Accused Gajaad, 42, chased minor girl and threatened to throw acid; Incidents in Yerawada area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MVA Mahamorcha | शरद पवारांचा इशारा, म्हणाले-‘राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा…’ (व्हिडिओ)

Prashant Damle | ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेनी सुनावले खडेबोल

Pathaan Hindi Movie | ‘पठाण’ सिनेमाच्या वादावर पुष्कर श्रोत्रींचे राम कदमांना उत्तर, म्हणाले…