Pune Crime | विनयभंगातील आरोपीला काही तासातच अटक केल्यानंतर न्यायालयाकडून 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हिंजवडीमधील आरोपी समीर जाधवने (Accused Sameer Jadhav) एका महिलेचा घरी जाऊन तिच्या मुलांसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग (Molestation Case) केला होता. या प्रकरणी तत्काळ गुन्हा (FIR) दाखल करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (PSI Ravindra Mudal) यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याला अवघ्या 72 तासांत शिवाजी नगर कोर्टाकडून (Shivaji Nagar Court) 18 महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Pune Crime)

 

आरोपी विरोधात मजबूत पुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (PSI Ravindra Mudal) यांनी दिली. यावेळी न्यायालयाचे कामकाज न्यायदंडाधिकारी श्रद्धा जी डोलारे (Magistrate Shraddha G. Dolare) यांनी पाहिले. दरम्यान, 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता पिडीत महिला घरी असताना आरोपी समीर जाधव याने मुलासमोर त्या महिलेचा विनयभंग केला होता. ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला होता. तर, पीडित महिलेने हिंजवडी पोलिसात (Hinjewadi Police) तक्रार दिल्यानंतर अवघ्या 36 तासांत आरोपी समीरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Pune Crime)

दरम्यान, यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करत सरकारी वकील विजयसिंह जाधव (Lawyer Vijay Singh Jadhav)
यांच्यातर्फे मजबूत पुरावे न्यायालयात सादर केले गेले.
दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे (Magistrate Shraddha G. Dolare)
यांनी आरोपी समीर जाधवला कलम 354 अन्वये 6 महिने,
कलम 452 अन्वये 6 महिने, कलम 506 अन्वये 6 महिने अशी सक्त मजुरीसह 9 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
तर, सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत (Senior PI Balkrishna Sawant)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ (PSI Ravindra Mudal) यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | accused of molestation arrested in few hours sentenced to 18 months imprisonment shivaji nagar court pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepika Padukone | शॉर्ट ड्रेसमध्ये दीपिका पादुकोणनं लावली सोशल मीडियावर आग

 

Rosewater Benefits | केवळ त्वचाच नव्हे, तर केसांसाठी सुद्धा चमत्कारापेक्षा कमी नाही गुलाब जल!

 

Pune Crime | अमरावती येथे सासूचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यात विमानतळ पोलिसांकडून अटक