Pune Crime | अमरावती येथे सासूचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यात विमानतळ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जावई व पत्नीमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूवर (Mother in Law) कुऱ्हाडीने (Ax) वार करुन खून (Murder) केल्याची घटना शुक्रवारी (दि.28) दुपारी अमरावती जिल्ह्यात (Amravati District) घडली होती. सासूचा खून करुन फरार झालेल्या आरोपी जावयाला पुणे पोलिसांच्या (Pune Police) विमानतळ पोलिसांनी अटक केली (Pune Crime) आहे. दिनेश भानुदास भोरखडे Dinesh Bhanudas Bhorkhade (वय-31 रा. पेठईतबारपुर पो. दर्यापुर जि. अमरावती) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील (Chandur Bazar Taluka) टाकरखेडा पूर्णा (Takarkheda Purna) येथे आरोपी जावयाने सासरवाडीत येऊन सासू व पत्नीशी शुल्लक कारणावरून वाद घालून सासूवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये सासू रुक्माबाई विनायक इंगळे Rukmabai Vinayak Ingle (वय-45) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेला.

 

विमानतळ पोलीस ठाण्यातील (Viman Nagar Police Station) तपास पथकाचे (Investigation Team) सहायक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे (API Avinash Shewale) व पोलीस शिपाई नाना कर्चे (Police Constable Nana Karche) यांना माहिती मिळाली की, अमरावती येथे सासूचा खून करुन फरार झालेला आरोपी दिनेश भोरखडे हा ट्रॅव्हल्स बसने येरवडा (Yerawada) येथे येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सासूचा खून केल्याची कबुली दिली.
याबाबत अमरावती ग्रामीण पोलिसांच्या (Amravati Rural Police) पूर्णा पोलीस ठाण्यात (Purna Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav)
यांच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, पोलीस हवालदार रमेश लोहकरे,
उमेश धेंडे, पोलीस नाईक सचिन जाधव, अंकुश जोगदंडे, रुपेश पिसाळ, विनोद महाजन, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Accused who escaped after killing his mother in law in Amravati was arrested by the airport police in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा