Pune Crime | खुनाच्या प्रयत्नासह दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी दत्तवाडी पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवून त्याच्या डोक्यात रॉडने मारून गळ्यातील पाच तोळे वजनाची सोनसाखळी चोरणाऱ्या (Thieves) दोघांना दत्तवाडी पोलिसांनी (Pune Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी एकजण सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो फरार होता. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) शुक्रवारी (दि.26) सिंहगड रोडवरील निलायम ब्रिजखाली (Nilayam Bridge) केली.

 

अशिष जितेंद्र दुबे (वय – 21 रा. अगरवाल हायस्कुल समोर,दत्तवाडी, पुणे), दयानंद ऊर्फ गौतम देवेंद्र साळुंखे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महेंद्र अनिल चौधरी (रा. तपोभुमी, म्हसोबा चौकाजवळ, दत्तवाडी, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 397, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. गौतम साळुंखे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचावर यापुर्वी कोथरुड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) येथे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र चौधरी हे गंगेश्वर महादेव मंदिरात (Gangeshwar Mahadev Temple) सोन्याची चैन घालून पूजा करण्यासाठी दररोज जात असतात. आरोपींनी त्यांना लुटण्याचा प्लॅन केला. त्यापूर्वी त्यांनी दोन वेळा त्यांच्यावर पाळत ठेवली. घटनेच्या दिवशी फिर्यादीचे पाठीमागुन येवून डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जखमी करुन महेंद्र चौधरी यांच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेली.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीतील गुन्हेगारांची झाडाझडती घेत असताना पोलीस हवालदार कुंदन शिंदे (Police Constable Kundan Shinde), पोलीस नाईक अमित सुर्वे (Police Naik Amit Surve) व पोलीस शिपाई प्रशांत शिंदे (Prashant Shinde) यांना बातमी मिळाली की, गंगेश्वर महादेव मंदीरात पुजा करण्यासाठी जाणारे महेंद्र चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गळ्यातील सोन्याची चैन हिसकावुन नेणाऱ्या आरोपीपैकी एक जण निलायम ब्रिजखाली सिंहगड रोड याठिकाणी कुणाला तरी भेटण्यास येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपी अशिष दुबे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्हा कबुल करुन हा गुन्हा त्याचा मित्र दयानंद ऊर्फ गौतम देवेंद्र साळुंखे याच्या मदतीने केल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomane)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे – पाटील, अमित चिव्हे, पुरुषोत्तम गुन्ला, प्रमोद भोसले, अमोल दबडे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.

 

 

Web Title : –  Pune Crime | Accused of robbery with attempt to murder arrested by Dattawadi police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा