Pune Crime | विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचा अपहरण करुन लुटल्याचा दावा; कोंढवा पोलिसांकडून चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आजारावर औषध घेण्यासाठी आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणीला तपासताना तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा सुहेल बाबासाहेब तांबोळी (Dr. Suhel Babasaheb Tamboli) या डॉक्टरावर गुन्हा (Molestation Case On Doctor Suhail Babasaheb Tamboli In Kondhwa Police Station) दाखल करण्यात आला होता़. त्यानंतर या डॉक्टराने चौघा जणांनी आपल्याला क्लिनिकमधून जबरदस्तीने ओढून जवळच्या गल्लीत नेवुन तेथे मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील ६ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याचा दावा केला आहे. (Pune Crime)

 

सुहेल बाबासाहेब तांबोळी (वय 36, रा. इशा बेला विस्टा, कोंढवा) असे या डॉक्टराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहेल तांबोळी याचे शिवनेरीनगर येथे तांबोळी क्लिनिक (Tamboli Clinic at Shivnerinagar, Kondhwa) आहे. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्याच्याकडे एका 22 वर्षाची तरुणी उपचार घेण्यासाठी आली होती. डॉ. तांबोळी याने तिच्या कमरेवर इंजेक्शन देण्याच्या व तपासणी करण्याच्या बहाण्याने या तरुणीच्या शरीरावर नको तेथे जाणीवपूर्वक हात लावून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) या डॉक्टराविरुद्ध फिर्याद दिली. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) ही फिर्याद घेऊन सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टरावर IPC 354 खाली गुन्हा दाखल केला. (Pune Crime)

दरम्यान, डॉ. सुहेल तांबोळी (Dr. Suhel Tamboli) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे क्लिनिकमध्ये असताना 7 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता चार जण आले.
त्यांनी तुम्हीच येथे डॉक्टर आहात का, असे फिर्यादीला म्हणून त्यांना जबरदस्तीने गल्ली नं. 20 मध्ये ओढत घेऊन गेले.
तेथे असलेल्या एका घरामध्ये नेऊन दरवाजाला आतून कडी लावून फिर्यादीला बाहेर जाण्यास प्रतिबंध केला.
त्यातील दोघांनी फिर्यादीचे हात दोरीने बांधले. चौघांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी रॉड व बेल्टने मारहाण केली.
तू त्या महिलेला नीट तपासले नाही.
तिची माफी मागून तू पैसे कसे देत नाही ते पाहतो,
असे म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील 30 हजार रुपयांची सोन्याची चैन व खिशातील 6 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा (Robbery In Pune) दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Allegation of kidnapping and robbing a doctor who was charged with molestation Kondhwa police registered robbery case against four

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा