Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत थोडी वाढ, मात्र मृत्यू संख्या घटल्याने दिलासा; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली, तरी कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 460 रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.7) राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नव्हता.

 

राज्यात आज 718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के झाले आहे. राज्यात आज 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज पर्यंत 1 लाख 43 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 69 हजार 498 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 3 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | A slight increase in the number of corona patients in the state, but relief due to decrease in the number of deaths; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane | बाळासाहेब ठाकरेनंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

 

Devendra Fadnavis | फडणवीसांनी टाकला ठाकरे सरकारवर ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’, ‘या’ नेत्यांच्या नावाचा उल्लेख (व्हिडिओ)

 

Important Diagnostic Tests For Women | चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी ‘या’ चाचण्या करायलाच हव्यात, जाणून घ्या