Nitesh Rane | बाळासाहेब ठाकरेनंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nitesh Rane | मागील महिन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांचा पोस्टरवर ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात अनेक राजकीय चर्चा रंगलेल्या दिसल्या. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करू नये, असे आदेश दिले होते. अशातच भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही यासंदर्भात केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

 

काही लोक हिंदुहृदयसम्राट असलेले बॅनर्स (Banners) लावतात मात्र तुम्ही माझी भावना विचारलीत तर हिंदुहृदयसम्राट ही पदवी बााळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोणाला द्यायची झाली तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना द्यावी, असं माझं म्हणणं आहे, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले. मुंबईमध्ये भाजपच्यावतीने अणुशक्तीनगर (Anushaktinagar) येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

 

नितेश राणे यांनी हे वक्तव्य करताच कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. घाटकोपर येथे मनसे विभागाचे अध्यक्ष गणेश चुक्कल (Ganesh Chukkal) यांनी परिसरात राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनर्स लावले होते. त्यावर राज ठाकरे यांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी देण्यात आली होती.

 

दरम्यान, या बॅनरची चर्चा राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी आपल्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट आधी अशी उपाधी लावू नका,
अशा शब्दात मनसेने (MNS) कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :-  Nitesh Rane | after balasaheb thackeray only hinduhridaysamrat is devendra fadnavis says nitesh rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | फडणवीसांनी टाकला ठाकरे सरकारवर ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’, ‘या’ नेत्यांच्या नावाचा उल्लेख (व्हिडिओ)

 

Important Diagnostic Tests For Women | चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी ‘या’ चाचण्या करायलाच हव्यात, जाणून घ्या

 

Holi 2022 | होळी कोणत्या तारखेला आहे ? होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल केवळ इतक्या मिनिटांचा, चुकवू नका