पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांना (criminal) खंडणी विरोधी पथक एकने (Anti extortion Cell Pune) अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे (Live Cartridges) जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळ मंगळवारी (दि.14) केली.
विशाल ज्ञानेश्वर रेणुसे Vishal Dnyaneshwar Renuse (वय-26 रा. मोरया हेरिटेझ, 225 शुक्रवार पेठ, पुणे) आणि आकाश कुमार शेटे Aakash Kumar Shete (वय-22 रा. शुक्रवार पेठ, भदानेवाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत असातना दोन तरुण दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळील आनंदमठ येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पथकला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता कंबरेला पाठिमागे दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपींविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (Arrest) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप बुवा (API Sandeep Buwa) करीत आहेत. (Pune Crime)
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ (Police Inspector Vinayak Vetal), सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, दुर्योधन गुरव, हनुमंत कांदे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime | Anti extortion Cell of Pune police arrests two for carrying unlicensed pistol; 2 pistols 10 cartridges seized
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Government Pension Schemes | जर ‘या’ 4 सरकारी पेन्शन योजनांमध्ये केली असेल गुंतवणूक तर निवृत्तीनंतर राहणार नाही टेन्शन; जाणून घ्या किती मिळतो रिटर्न
- Pune Police All Out Combing Operation | पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ ! 3213 जणांच्या तपासणीदरम्यान 33 कोयते, 8 तलवारी, चॉपर जप्त; 13 आरोपींना अटक, 38 केसेस दाखल
- 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! केंद्र सरकार 2.18 लाख रुपयांपेक्षा जास्त DA ची थकबाकी देणार