Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला; पोलीस कर्मचारी जखमी

पुणे : Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेचा (Hindu Rashtra Sena) पदाधिकारी व मोक्कातील आरोपी तुषार हंबीर (Tushar Hambir) याच्यावर ३ ते ४ जणांनी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) घुसून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसाने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ससून रुग्णालयात सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडली. थेट ससून रुग्णालयात कैद्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

२०१२ साली हडपसर परिसरात झालेल्या दंगलीत मोहसिन शेख (Mohsin Sheikh) याचा खून (Murder) करण्यात आला होता. हडपसर, काळेपडळ (Kalepadal, Hadapsar) भागात हंबीर याची दहशत आहे. त्यातूनच तुषार हंबीर याच्यावर मोक्का (MCOCA) खाली कारवाई करण्यात आली आहे.

Pune PMPML Employees | पीएमपीएमएल कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास….

हंबीर याच्यावर यापूर्वीही येरवडा कारागृहात (Yerwada Jail) हल्ला झाला होता. सध्या तो येरवडा कारागृहात होता. आजारी असल्याने त्याला २५ ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Pune Crime)

सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जण हातात कोयते घेऊन कैद्यांच्या वॉर्डमध्ये आले.
त्यांनी हंबीर याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
तेथे बंदोबस्तावर असलेला पोलीस कर्मचारी सावध होता.
त्यामुळे त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यामुळे हंबीर हल्ल्यातून वाचला.

Pune Crime | मांजरी खुर्द येथील आर.एस. डेअरी फार्मवर FDA चा छापा, 899 किलो नकली पनीर जप्त

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांना शोध घेतला जात आहे.

Web Title :- Pune Crime | Attack on Hindu Rashtra Sena’s Tushar Hambir at Sassoon Hospital; Police personnel injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढणार, गणपती विसर्जन मुसळधार पावसात; हवामान खात्यानं नेमकं काय म्हटलं?