Pune Crime | Rs 200 साठी वारंवार फोन करतो, थांब तुझा मर्डरच करतो; टोळक्याकडून तरुणाला चाकू-दगडाने मारहाण, सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | डेकोरेशनचे थकलेले पैसे परत मागितल्याने चिडलेल्या एकाने साथीदारांना बोलावून दोनशे रुपयांसाठी वारंवार फोन करतो, थांब तुझा मर्डरच करतो, असे म्हणून तरुणावर चाकू व दगडाने हल्ला करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) सुनिल पुरी Sunil Puri (रा. धायरी – Dhayari) व त्याच्या चार साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

सौरभ शिंदे Saurabh Shinde (वय २३, रा. धायरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजिंक्य सुधीर कांबळे Ajinkya Sudhir Kamble (वय २५, रा. धायरी गाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३९/२२) दिली आहे. ही घटना धायरीतील दुर्गाकृपा हॉटेलसमोर (Durgakrupa Hotel) रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य कांबळे हा शिक्षण घेत असून त्याचा मित्र सौरभ शिंदे याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय (Event Management Business) आहे. रविवारी रात्री ते बोलत असतना सौरभ याला सुनिल पुरी याचा फोन आला. मी तुला तुझे बिल देतो, तू एकटाच ये, दुसर्‍या कोणाला पाठविले तर मी पैसे देणार नाही, असे म्हणून त्याने शिंदे याला बोलावले. त्यानुसार अजिंक्य व सौरभ हे दुर्गाकृपा हॉटेलजवळ गेले. तेथे पोहचल्यावर सौरभ याने सुनिल पुरीकडे डेकोरेशनचे थकीत बिलाचे पैसे मागितले. तेव्हा सुनिल पुरी याने तू दोनशे रुपयांसाठी वारंवार फोन करतोस, असे म्हणत थांब तुझा मर्डर करुन टाकतो, असे बोलून त्याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळात तेथे चार जण आले. त्या सर्वांनी मिळून हाताने व दगडाने सौरभ याला मारण्यास सुरुवात केली. तेव्हा अजिंक्य याने त्याला मारु नका असे म्हटले, पण त्याचे कोणी ऐकले नाही. (Pune Crime)

सौरभ तेथून पळत जात असताना सुनिल पुरी व चार साथीदारांनी त्याचा पाठलाग केला. रस्त्यावर खाली पाडून दगडाने मारहाण केली.
सुनिल पुरी याने चाकूने सौरभच्या पाठीत वार केला. डोक्यात मोठा दगड घालून गंभीर जखमी केले.
त्यानंतर ते तेथून पळून गेले. सौरभ दुर्गाकृपा हॉटेलसमोर रस्त्यावर पडला होता. त्याचे डोक्यातून, पाठीतून रक्त येत होते.
दुचाकीवरुन अजिंक्य याने त्याला नवले हॉस्पिटलमध्ये (Navale Hospital) आणले. तेथे त्याची शुद्ध हरपली.
त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये (Command Hospital) दाखल करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कणसे (Assistant Police Inspector Kanase) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kille Murder Incident On Sinhagad Road Area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा