Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष; अजित पवारांनी सांगितले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या (Legislative Assembly Special Session) कालच्या पहिल्या दिवशी अध्यक्षांची (Assembly Speaker) निवड करण्यात आली यावेळी भाजपाकडून (BJP) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तर शिवसेनेकडून आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) हे उमेदवार म्हणून रिंगणात होते. नार्वेकर यांना 164 तर साळवी यांना 107 मते पडली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष (Assembly Speaker) म्हणून कुलाबा मतदारसंघाचे (Colaba Constituency) भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर विजयी झाले.

 

नवनिर्वाचित अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी त्यांचा उल्लेख, आतापर्यंतचे सर्वात तरूण अध्यक्ष असा केला. परंतु राहुल नार्वेकर हे दुसरे तरूण अध्यक्ष आहेत.

 

आज अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी देखील ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. खरं तर शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) हे 42 वर्षे सात महिन्यांचे वय असताना अध्यक्ष झाले होते. तर भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वय 45 वर्षे व पाच महिने इतके आहे.

आजपर्यंत शपथ घेताना अध्यक्षांचे वय

वय     अध्यक्ष

64      सयाजी सिलम (Sayaji Silam)

47      बाळासाहेब भारदे 1 (Balasaheb Bharade)

52       बाळासाहेब भारदे 2

57       शेषराव वानखेडे (Sheshrao Wankhede)

67       बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai)

42       शिवराज पाटील

52       प्राणलाल व्होरा (Pranlal Vora)

55       शरद दिघे (Sharad Dighe)

60       शंकरराव जगताप (Shankarrao Jagtap)

70       मधुकरराव चौधरी (Madhukarrao Chaudhary)

59       दत्ताजी नलावडे (Dattaji Nalawade)

57      अरुणलाल गुजराथी (Arunlal Gujarathi)

62      बाबासाहेब कुपेकर (Babasaheb Kupekar)

53      दिलीप वळसे (Dilip Walse)

70      हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade)

56      नाना पटोले (Nana Patole)

45    राहुल नार्वेकर

 

सर्वांत तरुण अध्यक्ष

शिवराज पाटील (42)
शपथ : 17 मार्च 1978
जन्म : 12 ऑक्टो. 1935

 

Web Title :- Assembly Speaker | rahul narvekar is the second youngest speaker in the maharashtra assembly first shivraj patil chakurkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या दिवशी शहरातून एकही ‘तक्रार नाही’ ! 11 जुलैनंतर ‘वेळापत्रका’ची फेररचना

 

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

 

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! हॉटेल, रेस्टॉरंटमधील सक्तीच्या सेवा शुल्क वसुलीवर बंदी