Pune Crime | बिर्याणीवरून झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न, न्यायालयाने दोघांना सुनावली कोठडी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | बिर्याणीवरून झालेल्या वादातून हॉटेलमालक आणि कामगारावर हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न (Pune Crime) केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. वैष्णव ऊर्फ बापू विशाल झांबरे (वय २३, रा. धायरी) आणि महेश संजय उबाळे (वय २०, रा. नऱ्हे) अशी पोलिस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मयूर राजेंद्र मते (वय ३३, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास धायरीतील (dhayari pune) गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये (hotel garva biryani sinhagad road) घडली. अटक आरोपींसह अनिकेत जाधव, तेजस निवंगुणे आणि ओंकार सातपुते यांच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी झांबरे आणि उबाळेला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामागे आरोपींचा हेतू अथवा गुन्हेगारी कट काय आहे, याचा तपास करायचा आहे, अन्य आरोपींचा शोध घ्यायचा आहे, आरोपींनी वापरलेले हत्यार जप्त करायचे आहे, या अनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम (Assistant Public Prosecutor Yogesh Kadam) यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

 

Web Title : pune crime | attempt to murder in hotel garva biryani sinhagad road police arrest two

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pimpri Crime | महिलेचा पाठलाग करत केली शरीर सुखाची मागणी; तरुणावर FIR दाखल

Modi Government | विना सरकारी नोकरीसुद्धा मोदी सरकार सर्वांना देतंय पेन्शन, जाणून घ्या कशी मिळवावी

Pune Corporation | वित्तीय तूट भरून काढण्यासाठी नागरिकांवर करांचा बोजा, दुसरीकडे ठेकेदारांवर कोट्यवधींची उधळपट्टी; मनसेचा महापालिका आयुक्तांना इशारा