Pune Crime | राजगुरुनगरच्या खरपुडी गावचे सरपंच विशाल काशिद यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे / राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) खेड तालुक्यातील खरपुडी (Kharpudi) गावचे सरपंच विशाल काशिद (Sarpanch Vishal Kashid) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला (attack) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी काशिद यांच्या कारची काच फोडून (reaking car glass) त्यांच्यावर पिस्तुल (Pistol) रोखले. परंतु काशिद यांनी जोरात गाडी चालविल्याने ते या घटनेतून थोडक्यात बचावले. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात (Pune Crime) खळबळ उडाली आहे.

याबाबत सरपंच विशाल काशिद यांनी अज्ञात चार व्यक्तीविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी काशिद यांच्या फीर्यादीवरुन गुन्हा (FIR) दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खरपुडीचे सरपंच विशाल काशिद आणि त्यांचे मित्र गुरुवारी (दि.16) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करुन घरी निघाले होते. खेड कनेसर (Kanesar) मार्गावरुन ते खरपुडी गावालगत कच्च्या रस्त्यावरुन चारचाकीतून घरी जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी काशिद यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावली.

चौघांनी तोंडाला रुमाल बांधले असल्याने काशिद यांना ते ओळखू आले नाही. दरम्यान, एकाने लाकडी दांडक्याने काशिद यांच्या कारची काच फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु काच फुटली नाही. हल्लेखोराने दगडाने कारची काच फोडली. तुला लई माज आला आहे, तुझा माज जिरवतो असे म्हणून त्यांनी खिश्यातून पिस्तुल काढून काशिद यांच्यावर रोखले. प्रसंगावधान ओळखून काशिद यांनी चारचाकी जोरात चालवल्यामुळे ते या घटनेतून थोडक्यात बचावले.

या घटनेची माहिती मिळताच खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत काशिद यांनी खेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
खरपुडी गावात लाखो रुपयांची विकास कामे सुरु आहेत.
हे विरोधकांना पाहवत नसल्याने राजकीय वैमनस्यातून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, असे काशिद यांनी सांगितले.

Web Titel :- Pune Crime | attempt to murder of vishal kashid sarpanch kharpudi village rajgurunagar khed of pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health News | दुसर्‍या लाटेनंतर लहान मुलं आणि प्रौढांमधील मणक्याच्या वेदनांमध्ये चार पटींनी वाढ; मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा इशारा

Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन अजित पवार म्हणाले…

Raosaheb Danve | युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी चालतील का?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…