Pune Crime | ‘मी फुरसुंगीचा भाई’ म्हणत लॉज व्यवस्थापकावर हल्ल्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लॉजमध्ये दोन गटातील वाद मिटविल्याच्या रागातून टोळक्याने व्यवस्थापकार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना (Pune Crime) 15 ऑक्टोबरला हडपसरमधील भेकराईनगर परिसरात घडली.

 

याप्रकरणी अक्षय अरूण गोरे Akshay Arun Gore (रा. गंगानगर, हडपसर) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. प्रकाश पनिका Prakash Panika (वय -29) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

प्रकाश हे विजय ओयो लॉजचे (Oyo Lodge) व्यवस्थापक असून दोन दिवसांपुर्वी अक्षय व त्याचे दोन मित्र तेथे आरामासाठी आले होते.
त्यांच्या रूमशेजारी मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. त्याचा त्रास होऊ लागल्यावरून तिघांनी ग्राहकासोबत वादवादी करीत त्याला मारहाण केली.
त्यावेळी प्रकाशने भांडणात मध्यस्थी केली होती. त्याचा राग आल्यामुळे दुसऱ्या दिवशी अक्षयने त्याच्या साथीदारांसह प्रकाश यांना शिवीगाळ केली.
दोघांवरही कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हवेत कोयते फिरवून दहशत माजवित अक्षयने मी फुरंसूंगीचा भाई आहे.
बाहेरून येऊन माझ्यावर हात टाकता का. तुझी विकेटच काढतो असे म्हणत धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने (PSI Saurabh Mane) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempted attack on lodge manager saying ‘I am Fursungi’s brother’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kishori Pednekar | ‘हे भाजपला उशिरा आलेले शहाणपण’, पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल    

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचे खासदार सुळेंना प्रत्युत्तर, म्हणाल्या – ‘भाजपाची काळजी सोडा सुप्रियाताई…, A for अमेठी, B for…’

Andheri By-Election | राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपाची माघार, मनसेने प्रतिक्रिया देताना म्हटले – ‘जर हा निर्णय…’