Pune Crime | कोथरूड परिसरातील सुतारदर्‍यात तरूणावर वार करून खुनाचा प्रयत्न; गणेश मांझीरे, समीर पडवळ, रोहित ढोकणेविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोथरुडमधील सुतारदरा (Kothrud News) येथे कट्ट्यावर बसला म्हणून एका टोळक्याने कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. याप्रकरणी सचिन दत्तात्रय नवस्कर (वय ३१, रा. मराठा मावळ कॉलनी, सुतारदरा) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

यावरुन गणेश मांझीरे (Ganesh Manjire), समीर पडवळ (Sameer Padwal), रोहित ढोकणे Rohit Dhokne (सर्व रा. सुतारदरा, कोथरुड-sutardara kothrud) यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (pune Crime) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ७ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नवस्कर हे घराजवळील जाधव पिठाच्या गिरणीजवळ रात्री उशिरा बसले होते.
यावेळी आरोपी हातात कोयते घेऊन तेथे आले. गणेश मांझीरे याने फिर्यादी यांना काही कारण नसताना तू या चौकात का बसला असे बोलून शिवीगाळ केली. समीर पडवळ व रोहित ढोकणे याने त्याची गचांडी पकडून त्यांना गणेश कॉलनीकडे ओढून नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गणेश मांझीरे याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी (Pune Crime) केले. सचिन नवस्कर यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी फिर्याद दिली असून पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल झालेला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Attempted murder by attacking a youth in Kothrud area; FIR against Ganesh Manjire, Sameer Padwal, Rohit Dhokne

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kolhapur Crime | धक्कादायक ! 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीनं राहत्या घरात घेतला गळफास

Disha Patani | दिशा पटानीने पोस्ट वर्कआउट व्हिडिओ केला शेअर, टायगर श्रॉफने दिली अशी प्रतिक्रिया

Online Gaming | मुलांना ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी पालक आणि शिक्षकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी