Pune Crime | टोळक्याचा धुडगुस ! कात्रज-कोंढवा रोडवरील पेट्रोल पंपाच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण; भारती विद्यापीठ पोलिसांकडून चोघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पेट्रोल भरण्यासाठी रांग लागली असताना ती मोडून पुढे आलेल्यास रांगेत येण्यास सांगितल्याने मोटारसायकल चालकाने साथीदारांना बोलावून पेट्रोल पंपावर (Petrol Pump In Gokulnagar, Pune) धुडगुस घातला. (Pune Crime)

 

याप्रकरणी संतोष शिवशरण यरगळ (वय ३९, रा. गोकुळनगर, कात्रज – Katraj) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.
ही घटना कात्रज – कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) गोकुळनगर (Gokul Nagar, Pune) येथील एम. के. खान पेट्रोल पंपावर (M. K. Khan Petrol Pump, Pune) बुधवारी रात्री १० वाजता घडली.
पोलिसांनी दुचाकीचालकासह ४ ते ५ जणांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यरगळ हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत होते.
दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी अनेक जण रांगेत थांबले असताना दोन दुचाकीवरील चार जण रांग मोडून पुढे आले व आमचे गाडीत आधी पेट्रोल टाका असे म्हणाले.
त्यावरुन पेट्रोल पंपावर काम करणारे मोहित सोडारी याने त्यांना रांगेत येण्यास सांगितले.
या गोष्टीचा राग आल्याने काही वेळाने दोन मोटारसायकलवरील चौघांनी इतर साथीदारांना बोलवून आणले.
त्यांनी संतोष यरगळ, मोहित सोडारी व पेट्रोल पंपावरील मॅनेजर सलीम शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले.
सहायक पोलीस निरीक्षक घावटे अधिक तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Beating of three including manager of petrol pump on Katraj Kondhwa road
Crime against four by Bharti Vidyapeeth Police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा