Pune Crime | पुण्यात उच्चभ्रु सोसायटीतील सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’; बिबवेवाडी पोलिसांकडून 2 एजंट अटकेत

पुणे : Pune Crime | बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (Prostitution Racket)
बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) पर्दाफाश केला आहे. येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालविणार्‍या दोघांना अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय ३४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या एजंटची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर (API Rajesh Usgaonkar) यांना बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस
(raskar palace bibwewadi pune) या उच्चभ्रु सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.
त्यानंतर तेथे छापा (Pune Crime) टाकण्यात आला.
तेथे वेश्याव्यवसाय करुन घेणार्‍या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.
तसेच दोघा एजंटना अटक करण्यात आली.
कारवाईच्या वेळी रोख ४ हजार रुपये, तीन मोबाईल, कंडोमची पाकिटे तसेच इतर मुद्देमाल जप्त (Pune Crime) करण्यात आला.
पिडित महिलांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशन येथे ठेवण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande), बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior police inspector sunil zaware), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर, उपनिरीक्षक प्रिया राजगुरु (PSI Priya Rajguru), सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मते, पोलीस अंमलदार श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे, तानाजी सागर, महिला पोलीस शिपाई बागवान, परकाळे यांनी केली आहे.

हे देखील वाचा

Pune Fire | पुण्यातील पिसोळी परिसरातील फर्निचर गोदामाला भीषण आग; तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर ‘नियंत्रण’

Under2 Coalition | महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार, पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारे देशातील पहिले राज्य

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Bibvewadi Police Station Exposed Prostitution Racket In Raskar Palace Bibvewadi Two Agent Arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update