Pune Crime | तोतया पोलिसाची स्पा सेंटर चालकाला धमकी; म्हणाला – ‘1 लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन’,

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलीस (Police) असल्याचे सांगून एकाने स्पा मसाज सेंटर (Spa Massage Center) चालकाकडे 1 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी (Threat) आरोपीने दिली. तसेच यातील काही रक्कम आरोपीने स्विकारली. हा धक्कादायक प्रकार (Pune Crime) सोमवारी (दि.7) दुपारी 3.50 च्या सुमारास पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे.

 

विशाल कैलास जौंजाळे Vishal Kailas Jaunjale (वय – 28 रा. हिंजवडी रोड – Hinjewadi Road, शिंदे वस्ती, मारुंजी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश शांताराम शिंदे Avinash Shantaram Shinde (वय – 26 रा. दौलत प्लाझा, कोपर आळी, लोहगाव – Lohgaon, ता. हवेली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव (API Sambhaji Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी विशाल जौंजाळे हा रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) एजंट म्हणून (Agent) काम करतो.
तर शिंदे यांचा पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात स्पा मसाज सेंटर आहे. आरोपी विशालने त्यांना पोलीस असल्याचे सांगितले.
त्यानंतर स्पा मसाज सेंटरमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
तसेच पैसे न दिल्यास स्वत:कडे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

आरोपीने शिंदे यांना स्पा मसाज सेंटरची आणि त्यामध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करण्याची धमकी देऊन स्पा सेंटरमध्ये 5 हजार रोख आणि 1 हजार ऑनलाइन स्विकारले.
त्यानंतर आरोपीने शिंदे यांच्याकडे 70 हजार रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि पोलिसांना सांगून कार्यवाही करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | bogus police threaten spa center operators if you dont pay rs 1 lakh the video will go viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा