Pune : कुविख्यात गुन्हेगार विशाल उर्फ ‘जंगल्या’सह 7 जणांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कुविख्यात गुन्हेगार विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते व त्याच्या टोळीला शस्त्रसाठ्यासह गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, काडतुसे आणि कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते (वय 30, रा. पीएमसी कॉलनी D/82 घोरपडी), राजू शिरीष शिवशरण (वय 28, रा.सर्वे नंबर 110, ठोंबरे वस्ती), पंकज सदाशिव गायकवाड (वय 34, रा -: मु.पो. कोलवडी, ता. हवेली), आकाश राजेंद्र सकपाळ (वय  26  रा-: B/1 फ्लॅट नं 3,रविराज टेरेस,सुखसागर नगर),  गणेश मारुती कुंजीर (वय 27 रा. कुंजीर वस्ती, थेऊर. हवेली), रामेश्वर बाळासाहेब काजळे (वय 33, रा. वडगाव शेरी) व ऋषिकेश राजेंद्र पवार (वय 19 रा. मु पो कोलवडी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

शहरात घरफोड्या, लूटमार तसेच रस्त्यावरील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना या गुन्हेगारावर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान युनिट तीनच्या पथकाला विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते हा त्याचे साथीदारांसह मगर पट्टा हडपसर येथे एका फ्लॅटमध्ये थांबलेला असून तो  हडपसर येथील प्रसिद्ध सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. तसेच या 7 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे

1 देशी बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत काडतुसे, तसेच 1 भारतीय बनावटीचा रिव्हॉल्वर व 6 काडतुसे व एक बारा बोर रायफल व दोन कोयते असा शस्त्र साठा मिळाला. तर एक फॉर्च्युनर कार व दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुतेवर खून, खुनाच्या प्रयत्नयासह 3 गुन्हे दाखल असून, तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. तर राजू शिरीष शिवशरण याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच पंकज गायकवाड यांच्यावर खुनाचे 2 व दरोड्याचा एक असे गुन्हे दाखल आहेत. आकाश सकपाळ याच्यावर खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. गणेश कुंजीर याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.