Pune Crime Branch | गुन्हे शाखेची कोंढवा, विश्रांतवाडी व वानवडी भागात मोठी कारवाई ! 37 लाखांचे कोकेन, एमडी, गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell Pune) दोनने कोंढवा (Kondhwa), विश्रांतवाडी (Vishrantwadi) व वानवडी (Wanwadi) परिसरात कारवाई करुन 37 लाख 30 हजार रुपये किंमतीचा कोकेन (Cocaine), मेफेड्रॉन (एमडी) Mephedrone (MD) व गांजा जप्त करुन आरोपींना अटक केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी बुधवारी (दि.14) कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, उंड्री मिरॅकल लाईफ स्पेस सोसायटी समोरील सार्वजनिक रोडवर एक परदेशी नागरिक कोकेन विक्री करण्यासाठी आला आहे. पथकाने सापळा रचून हसेनी मुवीनी मीचाँग (वय-35 रा. ब्रह्मानंद बिल्डींग, उंड्री मुळ रा. टांझानिया) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 152 ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी गुरुवारी (दि.15) विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
रात्री दहाच्या सुमारास पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना माहिती मिळाली की, लोहगांव रोड परिसरातील
धानोरी येथील अगत्य हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर एकजण मेफेड्रॉन विक्री करण्यासाठी येणार आहे.
पथकाने सापळा रचून किसन नंदकिशोर लधार (वय-34 रा.कलवड वस्ती, लोहगाव मुळ रा. नोका, बिकानेर, राजस्थान)
याला ताब्यात घेऊन 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 22 ग्रॅम एमडी जप्त केले.

तसेच पोलीस अंमलदार रविंद्र रोकडे यांना मिळालेल्या माहिती मिळाली की, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घोरडपी येथील इम्प्रेस गार्डन गेट समोरील सार्वजनिक रोडवर एकजण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे.
त्यानुसार पथकाने सापळा रचून ओंकार अनिल चंडालिया (वय-21 रा. उरुळी कांचन) याला ताब्यात घेऊन 2 लाख 40
लाख रुपये किंमतीचा 9 किलो गांजा जप्त केला. त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा
दाखल केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण,
पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी,
दिशा खेवलकर, साहिल शेख, महेश साळुंके, संदिप शेळके, अझिम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे व दिनेश बास्टेवाड
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Leader Ajit Pawar | ”संपूर्ण परिवार विरोधात गेला तरी जनता माझ्यासोबत”, अजित पवारांचे भावनिक आवाहन, सुप्रिया सुळेंवर केली टीका…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभेच्या तयारीला सुरुवात; लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Manoj Jarange Patil | जरांगेंनी नारायण राणेंना खडसावलं, ”वयाचा आदर करत होतो…आता मी पाणउतारा करेन”