Pune Crime Branch | पुणे : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या शिक्षकाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या (Chain Snatching) शिक्षकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पेट्रोलींग दरम्यान पाठलाग करुन अटक केली (Chain Snatcher Arrest). बाळू प्रकाश रणपिसे Balu Prakash Ranpise (वय-32 रा. मु.पो.बोरगाव, डॉ. आंबेडकर नगर, बौद्ध विहार जवळ, ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसका मारुन चोरून नेताना आरोपीला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.18) दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट परिसरात केली. (Pune Swargate Crime)

याबाबत मंजुळा नारायण चिल्लाळ (वय 59 रा. गुजरवाडी कात्रज पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड, पीएमटी बस स्टॉप या गर्दीच्या ठिकाण पेट्रोलींग करत होते. दरम्यान, फिर्य़ादी महिला ह्या स्वारगेट पोलीस ठाण्यासमोरुन घोरपडे पेठ (Ghorpade Peth Pune) कडे पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपीने पाठीमागून चालत येत महिलेच्या गळ्यातील 66 हजार रुपये किमतीचे 11 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळून जाऊ लागला.(Pune Crime Branch)

त्यावेळी पेट्रोलींग करत असलेले पोलीस अंमलदार मोहसीन शेख व संजय जाधव यांनी आरोपीचा पाठलाग करुन
त्याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो शिक्षक असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ट्रॅक पॅटच्या खिशात एक तुटलेले मंगळसुत्र मिळाले.
फिर्यादी यांनी ओळखून त्यांचेच असल्याचे सांगितल्याने पंचनामा करुन ते जप्त करण्यात आले आहे.
आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे
(IPS Shailesh Balkawade), पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे (ACP Sunil Tambe), वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई
(PI Nandkumar Bidwai) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे,
संजय जाधव, विनोद चव्हाण, नागनाथ राख व मोहसीन शेख यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका