Pune Crime Branch | पुणे : तडीपार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, तलवार जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई माळवाडी, हडपसर परिसरात केली. आदित्य उर्फ दाद्या बबन शिंदे (वय-24 रा. कामठेवस्ती, माळवाडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Police News)

गुन्हे शाखा युनिट-5 चे पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार अकबर शेख यांना माहिती मिळाली की, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगार आदित्य उर्फ दाद्या शिंदे याच्याकडे धारदार शस्त्र असून तो गंभीर गुन्हा करण्यासाठी माळवाडी, हडपसर परिसरात वावरत आहे. माहिती मिळताच तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंगझडती घेऊन एक तलवार जप्त केली. (Pune Crime Branch)

आरोपी आदित्य शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला पुणे शहर व संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला होता. पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस अंमलदार विनोद शिवले,
दया शेगर, शशिकांत नाळे, दाऊद सय्यद, पांडुरंग कांबळे, राहुल ढमढेरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांची 840 कोटींची केस सीबीआयने बंद केली,
आता काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतंय : रोहित पवार

Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Pune Dhankawadi Crime | पुणे : घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी तिघांना अटक