Pune Crime Branch | सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, पिस्टल व काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Record) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Cell Pune) एकने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल (Pistol Seized) व दोन काडतुसे असा एकूण 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.30) उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) हद्दीतील इंगळे कॉर्नर येथील मोकळ्या गार्डनमध्ये केली. सागर गणेश सुतार Sagar Ganesh Sutar (वय- २३ रा. गणपती माथा वारजे, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.(Pune Crime Branch)

खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अमलदार प्रफुल चव्हाण व सहायक पोलीस फौजदार संजय भापकर त्यांना माहिती मिळाली की, उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत इंगळे कॉर्नर येतील एप्पल हॉटेल आणि बार येथील मोकळ्या गार्डन येथे एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल व दोन जिवंत राऊंड असा एकूण 40 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी तसेच उत्तमनगर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास कमी त्याला उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा 1 सुनील तांबे (ACP Sunil Tambe) व खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Sr PI Krantikumar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijit Patil) , सहायक पोलीस फौजदार प्रवीण ढमाळ, संजय भापकर, नितीन कांबळे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामतीत लढायचे की नाही? आज शिवतारेंची सासवडमध्ये बैठक, कार्यकर्त्यांना विचारून घेणार निर्णय

Pune Kondhwa Crime | तरुणीला कीस करुन अश्लील चाळे, कोंढवा परिसरातील घटना

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune News | पोलीस यंत्रणा एफ.एफ.सी.पी. मुस्कान संस्थेमार्फत पथनाट्य सादर करुन जनजागृती

Rohit Pawar | ”अनेकजण परत येण्यास इच्छूक, हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है”, रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत